Congress : काँग्रेस नेत्यावर गुन्हे दाखल, चौकशी कामी हजर राहण्याची नोटीस जारी 

२ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील नेत्यांनी मुंबई निषेध रॅली आयोजित केली होती

100
Congress : काँग्रेस नेत्यावर गुन्हे दाखल, चौकशी कामी हजर राहण्याची नोटीस जारी 
Congress : काँग्रेस नेत्यावर गुन्हे दाखल, चौकशी कामी हजर राहण्याची नोटीस जारी 
पूर्व परवानगीशिवाय निषेध मोर्चा काढल्या प्रकरणी अनेक काँग्रेस (Congress) गट नेत्यांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांना नोटीस पाठवून चौकशीकामी तपास अधिकारी यांच्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आमदार वर्षा गायकवाड, प्रकाश रेड्डी, आमदार जीशान सिद्दीकी, माजी खासदार संजय निरुपम, चरणसिंग सप्रा, राखी जाधव, काँग्रेस नेते हुसेन दलवाई, प्रीती मेनन, अस्लम शेख असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या नेत्यांची नावे असून त्याचसोबत  इतर ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ ऑक्टोबर रोजी काँग्रेस (Congress) पक्षाच्या मुंबईतील नेत्यांनी मुंबई निषेध रॅली आयोजित केली होती. ही रॅली मेट्रो सिनेमापासून सुरू करण्यात आली व रीगल सिनेमातून जात महात्मा गांधी पुतळ्याजवळ संपणार होता. या रॅलीत आमदार वर्षा गायकवाड, प्रकाश रेड्डी, आमदार जीशान सिद्दीकी, माजी खासदार संजय निरुपम, चरणसिंग सप्रा, राखी जाधव, काँग्रेस नेते हुसेन दलवाई, प्रीती मेनन, अस्लम शेख  यांच्यासह शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(हेही वाचा-Mumbai High Court : फुटपाथवरील लोखंडी खांबांचा व्हीलचेअरसाठी अडथळा; उच्च न्यायालयात जनहित याचिका)

आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून या “मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती, आणि काँग्रेस नेत्यांना  यापूर्वीच कलम १४९ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या (पोलिसांनी दखलपात्र गुन्हे रोखण्यासाठी), त्यानंतर ही या रॅलीचे आयोजन करून कायदा आणि सु व्यवस्थेची निर्माण होऊल अशी परिस्थिती निर्माण करून सर्वसामान्यांना वेठीस धरले असे  एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यांच्यावर कलम १४३  (बेकायदेशीर सभा), १४५ (बेकायदेशीर सभेत सामील होणे किंवा पुढे जाणे, पांगण्याचा आदेश देण्यात आला आहे हे जाणून घेणे), ३४१ (चुकीचा संयम) आणि १८८ (लोकसेवकाने योग्यरित्या जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आम्ही सीआरपीसीच्या ४१ अ अंतर्गत काही नेत्यांना आवश्यकतेनुसार पोलिस अधिकार्‍यांसमोर हजर राहण्यासाठी नोटिस दिल्या आहेत आणि त्यांना सोमवारी जाण्याची परवानगी दिली आहे, असे पोलिस अधिकारी म्हणाले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=u5nkQ-4QciU

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.