कोलंबियामध्ये २०२६ मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक (Colombia presidential election) होणार आहे. मिगुएल उरीबे टर्बे (Miguel Uribe Turbay shoot) हे विरोधी सेंट्रो डेमोक्रॅटिको कॉन्सर्व्हेटिव्ह पार्टीचे (Centro Democrático Conservative Party) सदस्य आहेत. या निवडणुकीत ते राष्ट्रपतिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. याच निवडणुकीच्या निमित्ताने ते बोगोटामध्ये एका सभेला संबोधित करत होते. दरम्यान, त्यांच्यावर मागून गोळ्या झाडण्यात आल्या. स्थानिक मीडियानुसार, मिगुएल यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याचे सांगितले जात आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Colombia)
(हेही वाचा – पुढील पाच दिवस Manipur च्या पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आणि मोबाइल सेवा बंद !)
मागून डोक्यात गोळी मारली
डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाने एक निवेदन जारी करून याला हिंसाचाराचे तसेच अस्वीकार्य कृत्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे की, हा हल्ला फॉन्टीबॉन परिसरातील एका उद्यानात झाला.
गोळीबार करणाऱ्याला संशयिताला अटक
बोगोटाचे महापौर कार्लोस गॅलन (Mayor Carlos Galán) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर सांगितले की, संशयित गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक अधिकारी आणि पोलीस पथके संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. हल्लेखोराची पुढील चौकशी केली जात आहे.
पुढील वर्षी होणार होत्या निवडणुका
मे २०२६ मध्ये कोलंबियामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका आहेत. मिगुएल उरीबे टर्बे हे संभाव्य राष्ट्रपती पदाचे उमेदवार मानले जातात. यासाठी त्यांची कोलंबिया देशात निवडणूकीसाठी प्रचार रॅली काढण्यात आली होती.
(हेही वाचा – मस्क यांच्याशी संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही ; Donald Trump यांची स्पष्टोक्ती)
एक तरुण आणि गतिमान नेता म्हणून ओळखले जाते
मिगुएल उरीबे टर्बे हे एक प्रमुख कोलंबियन राजकारणी आणि डेमोक्रॅटिक सेंटर पार्टी (सेंट्रो डेमोक्रॅटिको) चे सदस्य आहेत ज्यांनी २०२४ मध्ये कोलंबियाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यांना एक तरुण आणि गतिमान नेता म्हणून ओळखले जाते ज्यांची राजकीय कारकीर्द मोठ्या वेगाने वाढत आहे.
या नेत्यांवरही झाले होते हल्ले
१३ जुलाई २०२४ रोजी अमेरिकेचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर पेनसिल्व्हेनियाच्या बटलर शहरात हल्ला झाला होता. तेही एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती, जी त्यांच्या कानाजवळून गेली होती. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. हल्ला केलेल्या आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीच ठार केले होते.
(हेही वाचा – Konkan Railway मार्गावर पावसाळी वेळापत्रक १५ जूनपासून लागू होणार; आता ‘ही’ ट्रेन आठवड्यातून तीनदाच धावणार )
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावरही जुलै २०२२ मध्ये नारा शहरात निवडणूक सभेत गोळी मारण्यात आली होती. त्यांच्यावरही मागून गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी त्यांच्या मानेवर आणि दुसरी छातीतून आरपार गेली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community