भारत-नेपाळ सीमेवर China मुले बनवत होते व्हिडिओ; फोनमध्ये आढळला खलिस्तानी मजकूर

अटक केलेल्या तरुणांसोबत भारतात प्रवेश करण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत.

97

बुधवारी, २८ मे या दिवशी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात २ चिनी (China) नागरिक भारत-नेपाळ सीमेवर व्हिडिओ बनवत होते. भारतीय सीमेवरील चेकपोस्टचे वारंवार व्हिडिओ बनवत असताना त्यांना संशय आला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. त्यांचे फोन देखील तपासले असता, त्यात खलिस्तानी समर्थनाशी संबंधित मजकूर देखील आढळला.

(हेही वाचा Bullet Train Virar : बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाच्या कामाला सुरूवात)

चौकशीदरम्यान, एसएसबीला दोघांची भाषा समजू शकली नाही. चिनी (China) तरुणांची नावे जाणून घेण्यासाठी, दोघांनाही त्यांची नावे लिहिण्यास सांगितले आणि गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने एसएसबीला कळले की एका तरुणाचे नाव वू हैलोंग आहे आणि दुसऱ्याचे नाव शेंग जुन्योंग आहे. अटक केलेल्या तरुणांसोबत भारतात प्रवेश करण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत. एसएसबीच्या म्हणण्यानुसार, अटक केलेल्या तरुणांना व्हिडिओ बनवण्याचे कारण विचारले असता, त्यांनी उत्तर दिले की ते व्हिडिओ ब्लॉगर आहेत आणि टिकटॉकवर व्हिडिओ बनवतात. चौकशी दरम्यान, त्यांच्या फोनमध्ये खलिस्तानी समर्थनाशी संबंधित व्हिडिओ आढळले. याशिवाय, भारताशी संबंधित इतर अनेक महत्त्वाची माहिती देखील मिळाली आहे. (China)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.