Worli Hit and Run प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही

93
Worli Hit and Run प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही
Worli Hit and Run प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही

राज्यात मागील काही दिवसांपासून हिट अँड रन (Worli Hit and Run) प्रकरणांच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना वरळी कोळीवाडा (Worli Koliwada Hit and Run case) भागात घडली आहे. यामध्ये  कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे ५.३० च्या सुमारास भरधाव कारने या दाम्पत्याला धडक दिली. वरळीच्या अटरिया मॉल परिसरात ही घटना घडली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. याप्रकरणी आरोपी चालक हा शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शाह (Mihir Shah) असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी मिहीर शाह आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Worli Hit and Run)

(हेही वाचा –Curry Leaves: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आहारातील कढीपत्त्याचे महत्त्व काय ? वाचा सविस्तर…)

संबंधित घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  मुंबईत झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. या घटनेत जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या घटनेतील आरोपी कोणीही असू दे, सरकार त्याला पाठीशी घालणार नाही. या सरकारमध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे. मग, तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  (Worli Hit and Run)

(हेही वाचा – हिंदू हिंसक असते तर मला स्वातंत्र्य आणि सुरक्षा गमवावी लागली नसती; Nupur Sharma यांनी राहुल गांधींना सुनावले)

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी सरकार आणि गृह विभाग नक्कीच योग्य त्या उपाययोजना करतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच राज्यातलं सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. कोणी कितीही आरोप केले तरी त्यात फार अर्थ नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Worli Hit and Run)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.