Chhatrapati SambhajiNagar Encounter : थरारक घटनेत उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याचा पोलिसांकडून एन्काऊंटर, गुन्हे शाखेला माहिती मिळताच केली कारवाई

Chhatrapati SambhajiNagar Encounter : छत्रपती संभाजीनगरमधील एका उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. वडगाव-कोल्हाटीतील थरारक घटनेत आरोपीने ०८ किलो सोने आणि ४० किलो चांदी लुटल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

130

Chhatrapati SambhajiNagar Encounter : छत्रपती संभाजीनगरमधील एका उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. वडगाव-कोल्हाटीतील थरारक घटनेत आरोपीने ०८ किलो सोने आणि ४० किलो चांदी लुटल्याची माहितीदेखील समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील बजाज नगर येथील बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.(Chhatrapati SambhajiNagar Encounter)

(हेही वाचा Maharashtra FYJC Admission 2025 : ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी )

वाळूज परिसरातील वडगाव-कोल्हाटी भागात अमोल खोतकर या आरोपीचा एन्काऊंटर(Chhatrapati SambhajiNagar Encounter) करण्यात आला असून पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. सहाजापूर भागात पोलिसांवर गाडी घृतल्याने पोलिसांकडून त्याच्यावर फायरिंग करण्यात आले. यात अमोल खोतकरचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. यात अमोल खोतकर मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. याच प्रकरणात त्याला पकडण्यात आले असता त्याने पोलिसांवर गाडी घातली.

(हेही वाचा Maharashtra Rain Update: राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दाणादाण! अनेक जिल्ह्यांना झोडपलं; जाणून घ्या कुठे काय घडलं ? )

उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दि. १५ मे रोजी पहाटे दरोडा पडला होता. त्यावेळी संतोष लड्डा हे कुटुंबीयांसह परदेशात गेले होते. संतोष लड्डा यांचा केअरटेकर बंगल्यात होता. दरोडेखोरांच्या टोळीने त्याच्या डोक्याला बंदूक लावून घरातील सोने आणि चांदी लुटून नेली होती. या दरोड्यात लड्डा यांच्या घरातील आठ किलो सोने आणि ४० किलो चांदी त्याचबरोबर, रोख रक्कम लुटण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांकडून पाच आरोपींना करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली जाणार का, याकडे लक्ष असेल.(Chhatrapati SambhajiNagar Encounter)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.