केंद्रीय अन्वेषण विभागा(CBI)चे संचालक प्रवीण सूद यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना पुढील एक वर्षांकरिता मुदतवाढ देण्यात आली असून निवड समितीने यास मान्यता दिली. प्रवीण सूद यांनी २५ मे २०२३ रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयच्य संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. दरम्यान, निवड समितीच्या शिफारशींवर आधारित, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती(एसीसी)ने २४ मे नंतर एक वर्षाच्या कालावधीसाठी सूद यांचा कार्यकाळ वाढविण्यास मान्यता दिली.
(हेही वाचा Crime : सीडीआर, मोबाईल लोकेशन विक्री; सायबर विभागाचा दोन कॉन्स्टेबलसह तिघांना अटक )
१९८६ च्या बॅचचे(कर्नाटक कॅडर) आयपीएस अधिकारी असलेले प्रवीण सूद सीबीआय संचालकपदी रुजू होण्यापूर्वी ते कर्नाटकचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. सूद यांनी पोलीस सेवेत सुमारे ३७ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. दीर्घ कारकिर्दीत सूद यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
विशेष म्हणजे मागील दिवसापूर्वीच केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआय संचालकां(CBI Director)च्या नियुक्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी चर्चा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक नवीन सीबीआय संचालकां(CBI Director)च्या नियुक्तीसाठी चर्चेसाठी करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community