Paud Temple : अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या चाँद नौशाद शेखवर गुन्हा दाखल ; Video Viral

Paud Temple : अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या चाँद नौशाद शेखवर गुन्हा दाखल ; Video Viral

412
Paud Temple : अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या चाँद नौशाद शेखवर गुन्हा दाखल ; Video Viral
Paud Temple : अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या चाँद नौशाद शेखवर गुन्हा दाखल ; Video Viral

पुण्यातील पौड (ता. मुळशी) (Paud Temple ) येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागेश्वर मंदिरात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची चाँद नौशाद शेख (वय 19, रा. पौड) याने विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने गावामध्ये सध्या संतापाची लाट पसरली आहे. अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना केल्याच्या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Paud Temple )

संतप्त स्थानिकांनी आरोपी चांद शेख (१९) आणि त्याचे वडील नौशाद शेख (४४) यांना मारहाण केली आणि त्यांना पोलिस ठाण्यात आणले. नौशादने “तुम्ही हिंदू आमचे काहीही करू शकत नाही” असे म्हणत उपस्थितांची थट्टा केल्याचे वृत्त आहे. चांद शेखच्या घृणास्पद कृत्याचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी शनिवारी (३ मे) निषेध मोर्चा काढला. मोर्चादरम्यान त्यांनी ‘जय श्री राम’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. (Paud Temple )

पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी म्हणाले की, जेव्हा गावकऱ्यांनी चांद शेखच्या कुटुंबाला त्याच्या कृत्याबद्दल माहिती दिली तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांच्याशी अपशब्द वापरले. पौड पोलिसांनी चांद शेख आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाबाबत, पौड येथील रहिवासी शिवाजी वाघवले यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की आरोपी चांद नौशाद शेख नागेश्वर मंदिरात आला, त्याने देवाची मूर्ती पाडली आणि तिचा अपमान केला. त्यानंतर स्थानिक लोक त्याच्या वडिलांशी बोलण्यासाठी त्याच्या घरी गेले. तथापि, मुलाच्या वडिलांनी धमकीची भाषा वापरली आणि त्यांना शिवीगाळ केली. (Paud Temple )

नेमकं काय आहे प्रकरण?
घटना समोर येण्याआधी सायंकाळी रितेश जाधव हे नागेश्वर मंदिरात आल्यानंतर अन्नापूर्णा देवीची मूर्ती हलवली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ही बाब शिवाजी वाघवले यांना सांगितली. वाघवले व जाधव आणि इतर काही जणांनी मांदिरात असलेला सीसीटीव्हीची तपासणी केली असता चाँद हा मुर्तीची विटंबना करताना दिसला. हे कृत्य करणारा कोण आहे आणि तो कुठे राहतो याची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्या सर्वांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांकडे चौकशी केली, त्यावेळी चाँदचे वडील नौशाद शेख यांनी आलेल्या या तरूणांनाच शिवीगाळ केली. यानंतर या जमावातील काही जणांनी चाँद शेख व नौशाद शेख या बाप-लेकाला पौड पोलिस स्टेशनमध्ये आणले. (Paud Temple )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.