अमेरिकेच्या कॅलिफोर्निया (California blast) राज्यातील एका क्लिनिकबाहेर बॉम्बस्फोट झाला असून, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे घोषित केले आहे. पाम स्प्रिंग्स शहराच्या डाउनटाउन भागात हा स्फोट झाला असून, त्यात क्लिनिकला गंभीर नुकसान झाले आहे आणि आसपासच्या इमारतींच्या खिडक्या व दरवाजे उडून गेले आहेत. हा स्फोट जाणूनबुजून घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (California blast)
याविषयी एफबीआयच्या लॉस एंजेलिस कार्यालयाचे प्रमुख अकिल डेव्हिस म्हणाले, “क्लिनिकला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.” ज्या व्यक्तीचा स्फोटात मृत्यू झाला, ती व्यक्ती संशयित आहे की नाही हे अद्याप डेव्हिस यांनी सांगितलं नाही. परंतु इतर कोणत्या संशयिताचा शोध सुरू नसल्याचं त्यांनी म्हटलंय. (California blast)
स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या कारजवळ एक मृतदेह आढळून आला. ही कार अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्सची असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 11 वाजता नॉर्थ इंडियन कॅन्यन ड्राइव्ह आणि ईस्ट ताचेवाह ड्राइव्हच्या चौकात हा स्फोट झाला. हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा प्रकार आहे की देशांतर्गत दहशतवादाचा, याचा तपास सध्या एफबीआयकडून सुरू आहे. पुढील चौकशीत या हल्ल्याचे स्वरूप स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (California blast)
हेही वाचा- ISRO च्या 101 व्या उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी; कारण आलं समोर …
एका अधिकाऱ्याने ‘अॅसोसिएटेड प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, तपासकर्त्यांचा असा अंदाज आहे की, मृत व्यक्ती कदाचित तोच होता ज्याने स्फोट घडवून आणला. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की तपास अजून प्राथमिक टप्प्यात आहे. पाम स्प्रिंग्सचे पोलीस प्रमुख अँडी मिल्स यांनी हा ‘जाणीवपूर्वक केलेला हिंसाचार’ असल्याचे सांगितले. ‘अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्स’ हे क्लिनिक डॉक्टरांनी पुष्टी केली की, त्यांचे क्लिनिक या स्फोटात नुकसानग्रस्त झाले आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. (California blast)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community