Mumbai Crime : महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मुंबईत खळबळ, हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 

मारेकऱ्यांनी या महिलेची हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

64
Mumbai Crime : महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मुंबईत खळबळ, हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 
Mumbai Crime : महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मुंबईत खळबळ, हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 
मुंबई पोर्ट ट्रस्ट वडाळा परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी या महिलेची हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. वडाळा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. (Mumbai Crime)
वडाळा पोलीस ठाण्याचे पथक गुरुवारी रात्री मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात गस्त घालत असताना त्या ठिकाणी एक अर्धवट जळलेली गोणी आढळुन आली. पोलिसांनी गोणी उघडली असता त्यात एका ३० ते ३५ वयोगटातील महिलेच्या मृतदेहाचे तुकडे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळुन आले. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (Mumbai Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनोळखी महिलेची हत्या एक ते दोन दिवसांपूर्वी करण्यात आली असून, मृतदेहाचे तीन तुकडे करून मृतदेह गोणीत भरून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निर्जन ठिकाणी आणून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वडाळा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मुंबई गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत तसेच मुंबईतील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या हरविलेल्या महिलांची माहिती तपासण्यात येत आहे. (Mumbai Crime)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.