Creative Academy : विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रिएटिव्ह अकॅडमीवर चालवणार बुलडोझर; आमदार महेश लांडगे यांचा इशारा

Creative Academy : नौशादसारख्या विकृतीला पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर शिक्षा करून अशा अकॅडमी किंवा संस्था त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

348
Creative Academy : विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रिएटिव्ह अकॅडमीवर चालवणार बुलडोझर; आमदार महेश लांडगे यांचा इशारा
Creative Academy : विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रिएटिव्ह अकॅडमीवर चालवणार बुलडोझर; आमदार महेश लांडगे यांचा इशारा

लोणावळ्यातील क्रिएटिव्ह अकॅडमीच्या (Creative Academy) नावाखाली नौशाद शेख (Naushad Sheikh) या धर्मांधाने विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. एका विद्यार्थिनीने लैंगिक शोषण (Sexual assault) आणि अत्याचारांसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या तपासात मोठे सेक्स रॅकेट उघड झाले आहे. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी हिंदू समाज संतप्त झाला आहे.

(हेही वाचा – Matunga Car Parking : माटुंग्यातील त्या वाहनतळाची जागा बदलणार का? रुईयासह पोद्दार कॉलेजमधील विद्यार्थ्यांची होणार गैरसोय)

नौशाद शेख जिहादी मानसिकता असलेली व्यक्ती

क्रिएटिव्ह अकॅडमी संस्थेचे संचालक नौशाद शेख यांची जिहादी मानसिकता असलेली ही व्यक्ती आहे. 2014 मध्ये देखील त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते; मात्र पुराव्यांअभावी तो बाहेर निघाला आणि आता पुन्हा एकदा लघिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही एवढीच मागणी करतो की गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात योगी पॅटर्न सुरू केलेला आहे, तो या संचालकाच्या घरावर आणि संस्थेवर बुलडोजर चालवावे, अशी संतप्त मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आज पिंपरी-चिंचवड येथे क्रिएटिव्ह अकॅडमी संस्थेच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge), अश्विनी जगताप, उमा खापरे, सकल हिंदू समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संस्था त्वरित बंद करा

या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच पिंपरी चिंचवड शहरात किंवा इतर ठिकाणी असे अकॅडमी चालवणाऱ्या संस्थांचा शोध घेऊन विद्यार्थिनीचे होत असलेले शोषण थांबविणे गरजेचे आहे, तसेच या नौशादसारख्या विकृतीला पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर शिक्षा करून अशा अकॅडमी किंवा संस्था त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करत आहोत, अशी मागणी या पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली.

जशास तसे उत्तर देणार – आमदार महेश लांडगे

या वेळी आमदार महेश लांडगे यांनीही कारवाईची चेतावणी दिली. ते म्हणाले की, क्रिएटिव्ह अकॅडमी संस्थेसंदर्भात आणि त्याच्या संचालकांसंदर्भात संपूर्ण माहिती महापालिकेच्या वतीने आम्ही घेणार आहोत. त्यानंतर या संस्थेवर बुलडोझर आम्ही चालवणार आहे. संस्थेची बिल्डिंग आम्ही पाडणार त्याला जशास तसे उत्तर देणार. अशा प्रकरणांमध्ये आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा यांची प्रवृत्ती वाढत जाते. त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाच्या मागे लागून कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरणार आहोत. (Creative Academy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.