Bribe : पंचवीस लाख रुपयांचे दोन हप्ते आणि ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या रुपात मागितली जीएसटी अधिकाऱ्यांनी लाच

नवी मुंबई येथील मे. धीरज पेट्रोकेमिकल्स अँड गॅस प्रा. लिमिटेड या कंपनीने दोन व्यापाऱ्याकडून माल खरेदी करून वेळेत जीएसटी भरणा केली नसल्याची नोटीस जीएसटी विभागाकडून कंपनीचे संचालक धीरज पांडे यांना नोटीस बजावण्यात आली होती.

3948
Bribe : पंचवीस लाख रुपयांचे दोन हप्ते आणि ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या रुपात मागितली जीएसटी अधिकाऱ्यांनी लाच
Bribe : पंचवीस लाख रुपयांचे दोन हप्ते आणि ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या रुपात मागितली जीएसटी अधिकाऱ्यांनी लाच

रोख पंचवीस लाखाचे दोन हप्ते आणि ५० लाखाच्या सोन्याच्या रुपात जीएसटी अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. वस्तू आणि सेवाकर (GST) राज्यकर सहायक आयुक्तांनी एका पेट्रोकेमिकल कंपनीच्या संचालकाकडे एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मुंबई लाच (Bribe) लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक आयुक्त अर्जुन सूर्यवंशी यांच्यासह पाच जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. (Bribe)

नवी मुंबई येथील मे. धीरज पेट्रोकेमिकल्स अँड गॅस प्रा. लिमिटेड या कंपनीने दोन व्यापाऱ्याकडून माल खरेदी करून वेळेत जीएसटी (GST) भरणा केली नसल्याची नोटीस जीएसटी विभागाकडून कंपनीचे संचालक धीरज पांडे यांना नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान २५ जुलै २०२३ रोजी राज्यकर सहाय्यक आयुक्त अर्जुन सूर्यवंशी यांनी पथकासह धीरज पांडेंच्या घरी छापेमारी करण्यात केली होती. (Bribe)

(हेही वाचा – Sanjay Raut यांचा अजब सल्ला; ‘आता Supreme Court नेही रस्त्यावर उतरले पाहिजे’)

अर्जुन सूर्यवंशी यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या छापेमारीदरम्यान पांडे यांना पाच कोटी रुपयांचा जीएसटी (GST) भरणा केली नसल्यामुळे त्यांना अटक होऊ शकते अशी भीती घालून पांडे यांच्याकडे हे प्रकरण पाच वर्षे पुढे लांबविण्यासाठी जीएसटी (GST) अधिकाऱ्यांनी १ कोटी रुपयांची मागणी करून २५ लाखांचे दोन हफ्ते रोख आणि ५० लाख रुपयांचे सोने अशी लाचेची (Bribe) मागणी केली. पेट्रोकेमिकल कंपनीने या प्रकरणी जीएसटी (GST) आयुक्तलयात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यानंतर हे प्रकरण लाच (Bribe) लुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आले होते. लाच (Bribe) लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात लाच (Bribe) मागितल्याने पुरावे आढळून आल्यानंतर लाच (Bribe) लुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी सहाय्यक राज्यकर आयुक्त अर्जुन सूर्यवंशी यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bribe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.