मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला (Bombay High Court Aurangabad Bench) बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल आल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा मेल चेन्नई येथून आल्याचे बोलले जात आहे. याबाबतची माहिती मिळताच औरंगाबाद उच्च न्यायालय (Bombay High Court Aurangabad Bench) परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. न्यायालयाच्या सर्व दरवाजांसमोर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच हा मेल कोणी पाठवला आहे, याबाबत पोलिस अधिकचा तपास करत आहे.
अधिकची माहिती अशी, मंगळवार, २२ मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास हा धमकीचा मेल आला होता. धमकीचा मेल आल्याची माहिती उच्च न्यायालय (Bombay High Court Aurangabad Bench) प्रशासनाने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे, हायकोर्ट सुरक्षाधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे शिवचरण पांढरे तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचे चार पथके, एटीएसचे पथक खंडपीठात दाखल झाले.
(हेही वाचा रस्त्यात अडथळा निर्माण करणारी Mazar केली जमीनदोस्त; उत्तराखंडमध्ये प्रशासनाची धडक कारवाई)
न्यायालयाच्या (Bombay High Court Aurangabad Bench) संपूर्ण परिसरात तपासणी सुरू असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत आणि प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच न्यायालयातील कामकाज देखील नियमित सुरू ठेवण्यात आले आहे. पोलिस यंत्रणा त्यांचे काम करत असून न्यायालयातील कामकाज तसेच ज्यांना न्यायालयात सुनावणीसाठी येणे अपेक्षित आहे त्यांनाच प्रवेश दिला जात आहे.
Join Our WhatsApp Community