पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब(Bomb Threat) ठेवल्याचा धमकी देणारा कॉल बुधवार सकाळी ९:१५ च्या सुमारास महाराष्ट्र पोलिसांना आल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलिसांना ११२ या क्रमांकावर निनावी कॉलद्वारे पुणे रेल्वे स्टेशन, येरवडा, भोसरी याठिकाणी बॉम्ब(Bomb Threat) ठेवल्याची धमकी देण्यात आली. या धमकीच्या कॉलनंतर राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून निनावी कॉलचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
(हेही वाचा Jyoti Malhotra म्हणते, पाकिस्तानी लोकांनी खूप प्रेम दिले; डायरीत लिहून ठेवल्यात आठवणी )
दरम्यान, धमकीचा कॉलनंतर पुणे पोलीस कंट्रोल रुमकडून बंडगार्डन पोलीस स्टेशन सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित धमकी कॉल(Bomb Threat) ची माहिती गव्हर्मेंट रेल्वे पोलीस(जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दल(आरपीएफ) यांना त्वरित कळविण्यात आली असून बॉम्ब शोधक व निकामी करणारे पथक आणि श्वान पथक यांचा समावेश असलेल्या संयुक्त शोध मोहीम सुरू केली. या शोधमोहिमेत कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे समोर आले.(Bomb Threat)
Join Our WhatsApp Community