भाजपा आमदार Mihir Kotecha यांच्या वाहन चालकाला गुंडाची धमकी

80
भाजपा आमदार Mihir Kotecha यांच्या वाहन चालकाला गुंडाची धमकी
भाजपा आमदार Mihir Kotecha यांच्या वाहन चालकाला गुंडाची धमकी

‘तु आमदार का ड्राईव्हर है ना?, तेरे आमदार को बोलना, हिसाब मे रहने का, नही तो तेरे आमदार को मै छोडूंगा नही, तू जानता नहीं मैं कौन हू” या आशयाची धमकी देऊन आमदार महिर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या वाहन चालकाला (Driver) मारहाण करणाऱ्या सत्यवान गरुड (Satyavan Garuda) या गुंडा विरुद्ध मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून शनिवारी त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी (Ajay Joshi) यांनी दिली.

मुलुंड विधानसभेचे भाजपा आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्याकडे मागील २३” वर्षांपासून वाहन चालक म्हणून नोकरी करणारा मुत्तु पलानी तेवर (४३) हे शुक्रवारी रात्री ९:३० वाजता आमदार कोटेचा यांचे देवीदयाळ रोड मुलुंड पश्चिम या ठिकाणी असलेल्या कार्यालयाजवळ आमदार कोटेचा यांचे वाहन सोडून घरी जाण्यास निघाले होते. दरम्यान कार्यालया पासून काही अंतरावर चालक तेवर याला स्थानिक गुंड सत्यवान गरुड याने अडवले.

(हेही वाचा – Gujrat ATS : आदिती भारद्वाजच्या नावाखाली असलेलं व्हॉट्सअॅप नंबर पाकिस्तानमधून ऑपरेट; आरोग्य कर्मचारी ते हेरगिरी अन् धक्कादायक खुलासे)

तेवर यांच्या खांदयावर हात टाकुन सत्यवान गरुड (Satyavan Garuda) याने तेवर याचा मोबाईल फोन हिसकावून घेत ‘ तु आमदार का ड्राईव्हर है ना?, तेरे आमदार को बोलना, हिसाब मे रहने का, नही तो तेरे आमदार को मै छोडूंगा नही, तू जानता नहीं मैं कौन हू” असे बोलून त्याने त्याने हिसकावलेला फोन कानाला लावून ‘मै फोन करूंगा तो मुझे बता देना, तेरा आमदार कहाँ है और किधर जानेवाला है, अगर तु नही बताया तो मैं तुझे भी ठोकूंगा और तेरे आमदार को भी मारूंगा, तू मुझे जानता नही, मेरा नाम सत्यवान गरूड है, तेरे आमदार के चेले लोगों को मेरा नाम मालूम है, मेरी बात याद रखना” असे बोलून त्याने तेवर याचा मोबाईल फोन परत करून तेवरच्या कानाखाली मारली आणि तेथून निघून गेला.

शुक्रवारी झालेल्या घटनेने घाबरलेला तेवर हा घरी भांडुप (Bhandup) येथे निघून गेला, शनिवारी दुपारी कामावर आल्यानंतर त्याने शुक्रवारी रात्री झालेला प्रकार आमदार कोटेचा यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना सांगितला.सहकाऱ्यांनी तेवरला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी सांगितले. शनिवारी दुपारी तेवर याने मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सत्यवान गरुड याला अटक केली असून त्याला रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी (Ajay Joshi) यांनी दिली. सत्यवान गरुड हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याने दारूच्या नशेत धमकी दिली असेही जोशी यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.