Bhopal Hindu Girl Rape Case: भोपाळमधील एका खाजगी महाविद्यालयातील तीन हिंदू विद्यार्थिनींवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे शहरातील तणाव आणखी वाढला आहे. तसेच सोमवारी, वकिलांच्या एका गटाने तीन आरोपींना न्यायालयाच्या परिसरात मारहाण केली. त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडाला होता. तर हिंदू संघटनांनी (Hindu Organizations) जिल्हा रुग्णालयात निदर्शने करून आरोपींना जनतेच्या हवाली करण्याची मागणी केली आहे. (Bhopal Hindu Girl Rape Case)
(हेही वाचा – भाजपाच्या Chitra Wagh यांचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाल्या, ‘काँग्रेसी मानसिकता पाकिस्तानशी मिळतीजुळती’)
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोमवारी आरोपी फरहान खान, अली खान आणि साहिल खान यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मुख्य आरोपी फरहान अलीला ३० एप्रिलपर्यंत आणि अलीला २ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मात्र, पोलीस त्यांना कोर्टरूममधून बाहेर काढून जीपमध्ये बसवत असताना कोर्टाच्या आवारातील वकिलांचा रोष उफाळून आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संतप्त वकिलांनी ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत आरोपींवर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान वरिष्ठ वकील आणि राज्य बार कौन्सिलचे सह-अध्यक्ष राजेश व्यास (Rajesh Vyas) म्हणाले, “या घटनेवर वकील समुदाय, विशेषतः तरुण वकील अत्यंत संतप्त आहेत. आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने आमचा निषेध नोंदवत आहोत. अशा घटनांची पुनरावृत्ती होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. भविष्यात असे घडल्यास संबंधितांवर हल्ला केला जाईल.” एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींपैकी एक सैफ अली, याला वाचवण्यात आले आणि सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
(हेही वाचा – महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत सक्षम होईल; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास)
वकिलांचा रोष पाहून पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा दलांची मागणी केली. क्विक रिअॅक्शन टीम न्यायालयात पोहोचेपर्यंत आरोपींना सुमारे ३ तास कोर्टरूममध्ये बसवून ठेवण्यात आले. पथक दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षित आरोपींना जीपमध्ये नेले, परंतु या दरम्यान वकिलांनी पुन्हा त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community