Bharat Petroleum :  भारत पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईनमधून कनेक्शन करून इंधन चोरी

Bharat Petroleum कंपनीच्या मुंबई ते मनमाड या पाईपलाईनला थेट टॅप करून नळ कनेक्शन करतो त्याप्रमाणे थेट पाईपलाईनद्वारे दूरपर्यंत कनेक्शन करण्यात आली तब्बल 48 फूटपेक्षा जास्त पाईपलाईन लावून नळ कनेक्शन जोडतो त्याप्रमाणे जोडून त्या पाईपलाईन मधून हजारो लिटर डिझेलची चोरी करण्यात येत होती काल एका शेतकऱ्याच्या विहिरीत डिझेल उतरल्याने त्याचा तपास करत असताना अत्याधुनिक मशीनद्वारे ही चोरी उघडकीस आली

95

Bharat Petroleum कंपनीच्या मुंबई ते मनमाड या पाईपलाईनला थेट टॅप करून नळ कनेक्शन करतो त्याप्रमाणे थेट पाईपलाईनद्वारे दूरपर्यंत कनेक्शन करण्यात आली तब्बल 48 फूटपेक्षा जास्त पाईपलाईन लावून नळ कनेक्शन जोडतो त्याप्रमाणे जोडून त्या पाईपलाईन मधून हजारो लिटर डिझेलची चोरी करण्यात येत होती काल एका शेतकऱ्याच्या विहिरीत डिझेल उतरल्याने त्याचा तपास करत असताना अत्याधुनिक मशीनद्वारे ही चोरी उघडकीस आली मात्र ही चोरी कोणी केली, हे हे समजले नसून कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे अज्ञात व्यक्ती विरोधात मनमाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय कुमार करे यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असेकी मनमाडला भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांचे इंधन प्लांट आहेत या इंधन प्लांटमध्ये पेट्रोल डिझेल केरोसीन यांचा साठा करून उत्तर महाराष्ट्र सह मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना येथून इंधनपुरवठा केला जातो मनमाडच्या भारत पेट्रोलियम या ठिकाणी थेट मुंबई ते मनमाड पाईपलाईन टाकण्यात आली असून या पाईपलाईन द्वारे पेट्रोल डिझेल व केरोसीनचा इंधन पुरवठा केला जातो या आधी देखील या पेट्रोल पाईपलाईन मधून चोरी करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते.

मात्र यंदाही चोरी अगदी गुप्त पद्धतीने कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने करण्यात आली मनमाड ते मुंबई दरम्यान असलेली पाईपलाईन शेतकऱ्यांच्या शेतामधून आलेली आहे अनकवाडे शिवारात संपत चव्हाण या शेतकऱ्याच्या विहिरीत डिझेल पेट्रोल उतरल्याची माहिती कंपनीला मिळाली कंपनी तात्काळ शोध म्हणून सुरू केली मात्र याचा तपास लागला नाही यासाठी खास दिल्लीवरून डी. सी. व्ही.जी. मशिन द्वारे सर्वे करण्यात आला या सर्वेत चार ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याची माहिती समोर आली मात्र दोन ठिकाणी केवळ पॅकिंग लिकेज असल्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आली.

(हेही वाचा Crime : सीडीआर, मोबाईल लोकेशन विक्री; सायबर विभागाचा दोन कॉन्स्टेबलसह तिघांना अटक )

मात्र याच ठिकाणी काही अंतरावर दीड इंची छिद्र करून टॅप मारून थेट पाईपलाईन द्वारे नळ कनेक्शन करतो त्याप्रमाणे 48 फुटापर्यंत नळ कनेक्शन करण्यात आले व यातून रोज हजारो लाखो लिटर पेट्रोल डिझेल चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली याबाबत कंपनीच्या वतीने अनुज नितीन धर्मराव, वय ३३ वर्ष, धंदा नोकरी, प्रबंधक, आर. ओ. यु. मुंबई- मनमाड- बिजवासन पाईपलाईन नाशिक, रा. बी.पी.सी.एल. इन्स्टॉलेशन पानेवाडी ता. नांदगाव जि. नाशिक यांनी रीतसर फिर्याद दिली घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पाहणी करून रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेबाबत मंडळ अधिकारी मनमाड व तलाठी प्रतिभा नागलवाड यांनी पचनामा केला आहे.अज्ञात इसमाविरोधात पेट्रोलियम आणि खनिज पाईपलाईन अधिनियम १९६२ (जमिन उपयोगाचा अधिकार) आणि यात सन २०११ मध्ये केलेले संशोधन अधिनियम कलम १५, १६ व भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.Bharat Petroleum

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.