
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरात सरकारने घुसखोरांविरुद्ध (Bangladeshi Infiltrator) मोठी कारवाई केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी अहमदाबाद आणि सुरतमधील अनेक भागात छापे टाकले आणि ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी बहुतेक बांगलादेशी नागरिक आहेत. (Bangladeshi Infiltrator)
अहमदाबादमध्ये सुमारे ४५४ आणि सुरतमध्ये १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरू आहे आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. काही लोकांकडे भारतीय आधार कार्डही सापडले आहेत. पोलिसांनी सर्वांचे फोनही जप्त केले आहेत. (Bangladeshi Infiltrator)
हेही वाचा- Amit Shah यांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन ; दिले महत्त्वाचे निर्देश
गुजरात पोलिसांची घुसखोरांना पकडण्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. पोलिसांची ही कारवाई शनिवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू झाली आणि सकाळी ६ वाजेपर्यंत चालली. घुसखोरांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी सर्वांना पायी पोलिस मुख्यालयात नेले. (Bangladeshi Infiltrator)
#WATCH | Ahmedabad, Gujarat: This morning, starting from 3 am, the Ahmedabad Crime Branch, along with teams from the SOG, EOW, Zone 6, and Headquarters, organised a combing operation to apprehend foreign immigrants residing illegally in Ahmedabad city. During this operation, more… pic.twitter.com/lYXvQiz0VV
— ANI (@ANI) April 26, 2025
गृहमंत्र्यांच्या सूचनांनुसार गुजरात सरकारची कारवाई
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व राज्य सरकारांना परदेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याचे निर्देश दिले. यानंतर, गुजरात सरकारने पोलिसांना राज्यातील मोठ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना तात्काळ ताब्यात घेण्यास सांगितले, आणि कारवाई करण्यात आली. (Bangladeshi Infiltrator)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community