Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील मुंबके गावात असलेल्या एकूण चार मालमत्ता लिलावात उपलब्ध होत्या, परंतु त्यापैकी दोनसाठी ऑनलाइन निविदा प्राप्त झाल्या होत्या, अनुक्रमे चार आणि तीन साठी बोलीदार प्राप्त झाले आणि त्या दोघांसाठी एकच व्यक्ती यशस्वी बोलीदार म्हणून समोर आली.

278
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) कुटुंबातील जप्त करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेचा शुक्रवारी (०५ जानेवारी) दुपारी दक्षिण मुंबईतील आयकर भवन येथे लिलाव पार पडला. ४ मालमत्तेपैकी २ मालमत्तेचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून करण्यात आला आहे. सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपयांची बोलण्यात आली. (Dawood Ibrahim)

केंद्र शासनाने (Central Govt) ही मालमत्ता साफेमा (स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर्स) कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या कुटुंबाच्या नावे असणारी मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या ४ स्थावर मालमत्तेपैकी २ मालमत्तेचा शुक्रवारी दुपारी दक्षिण मुंबईतील आयकर भवन येथे लिलाव पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील मुंबके गावात असलेल्या एकूण चार मालमत्ता लिलावात उपलब्ध होत्या, परंतु त्यापैकी दोनसाठी ऑनलाइन निविदा प्राप्त झाल्या होत्या, अनुक्रमे चार आणि तीन साठी बोलीदार प्राप्त झाले आणि त्या दोघांसाठी एकच व्यक्ती यशस्वी बोलीदार म्हणून समोर आली. (Dawood Ibrahim)

(हेही वाचा – App Based Cabs : मुंबईत ॲप आधारित १६९० कॅबची तपासणी; १९.७६ लाख रुपयांचा दंड वसूल)

ई-टेंडरच्या माध्यमातून मालमत्ता विकण्यात आली 

१७०.९८ चौरस मीटर शेतजमीन असलेल्या ३ नंबर मालमत्तेला १५.४४० च्या राखीव सरकारी बोलीवर सर्वाधिक बोली २.०१कोटी मिळाली. ४ नंबरची मालमत्ता १७३० चौरस मीटरच्या शेतजमिनीला १.५६.२७० राखीव बोलीला ३.२८ लाखची सर्वोच्च बोली लावण्यात आली. हा लिलावासाठी ऑनलाइन पद्धतीने अगोदरच अर्ज करण्यात आले होते, ई-टेंडरच्या माध्यमातून ही मालमत्ता विकत घेण्यात आली होती. शुक्रवारी केवळ ऑनलाइन लिलावाची औपचारिकता पार पाडण्यात आली. खरेदी केलेली जमीन ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुबेक गावातील असून ती मालमत्ता दाऊदची (Dawood Ibrahim) आई अमीनाबी हिच्या नावे असल्याची माहिती समोर आली. मालमत्ता खरेदीदाराचे नाव उघड करण्यात आलेले नसून तसेच सर्वोच्च बोली लावून जमीन खरेदी करणाऱ्याचे नाव देखील उघड करण्यात आलेले नाही. (Dawood Ibrahim)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.