बऱ्याच दिवसांच्या देखरेखीनंतर पकडण्यात आलेल्या हेराकडून दहशतवादविरोधी पथका(ATS)ला तपासात धक्कादायक माहिती मिळाली आहे. भारताने पाकिस्तानविरुध्द केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आतापर्यंत हरयाणा आणि पंजाबमधून ०८ हेरांना पकडण्यात आले. या हेरांची चौकशी भारतीय तपास यंत्रणां(ATS)कडून करण्यात येत असून धक्कादायक खुलासे तपासाअंती समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून अटक करण्यात आलेल्या शहजादबद्दल दहशतवादविरोधी पथका(एटीएस)ने नवा खुलासा केला आहे.(ATS)
(हेही वाचा School Bus Terror Attack : बलुचिस्तानात शाळेच्या बसवर आत्मघातकी हल्ला; ४ मुलांचा मृत्यू तर ३८ जण जखमी )
एटीएसच्या म्हणण्यानुसार, शहजाद भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी करत होता. तसेच, शहजादला बऱ्याच दिवसांच्या देखरेखीनंतर पकडण्यात आले. माध्यमांच्या अहवालानुसार, शहजाद भारत-पाकिस्तान सीमेवर सौंदर्यप्रसाधने, मसाले, कपडे आणि इतर गोष्टींची बेकायदेशीरपणे तस्करी करत असे. याच काळात शहजाद आयएसआयच्या संपर्कात होता. पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेला भारतातील संवेदनशील माहिती पुरविण्यासोबतच १७ मे २०२५ रोजी हरियाणातील नूह येथून पकडलेल्या मोहम्मद तारिफचेही वक्तव्य समोर आल्याचे एटीएसने म्हटले आहे.
महत्त्वाचे म्हणजे शहजाद उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील अनेक तरुणांना पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण देण्याकरिता पाठवत असे. तसेच, तस्करीच्या बहाण्याने त्याने हेरगिरीसाठी तयारी केली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानच्या सिरसा एअरबेसवर भारताने जिथे हल्ला केला होता त्याची माहिती शहजादचा साथीदार तारिफने शत्रूंना दिल्याचेही समोर आले आहे.
(हेही वाचा छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; २५ हून अधिक Naxalite ठार झाल्याची माहिती )
शहजादने रामपूरमधील काही तरुणांनाही यात सामील करून घेतले आणि हळूहळू त्यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवण्याची सर्व तयारी केली. सुरक्षा संस्थांच्या रडारवर न येण्याकरिता पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड अॅप्लिकेशन्सचा पुरेपूर वापर केल्याचे उघडकीस आले. व्हॉट्सअॅप कॉल आणि एन्क्रिप्टेड मेसेजद्वारे हेरगिरी करण्यापासून ते लोकांशी संपर्क साधण्यासाठी याचा वापर केला, असे तपासात उघडकीस आले आहे.(ATS)
Join Our WhatsApp Community