Arun Gawali: गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश

236
Arun Gawali: गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश
Arun Gawali: गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, शुक्रवारी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची (Arun Gawali)  मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले. नागपूर खंडपीठाने कारागृह व्यवस्थापनाला याप्रकरणी उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली आहे. मुंबई शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर (Kamlakar Jamsandekar) यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Arun Gawali)

(हेही वाचा – Heatwave: मुंबईसह विदर्भात उकाडा वाढला; आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली)

अरुण गवळी (Arun Gawali) याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे शिक्षेतून सूट मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गुंड अरुण गवळीच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. हायकोर्टाने आज, शुक्रवारी याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने अरुण गवळीची मुदतपूर्व मुक्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याप्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी कारागृह प्रशासनाला उत्तर देण्यासाठी 4आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. (Arun Gawali)

(हेही वाचा – IPL 2024, Chennai’s Love For Biryani : चेन्नई सुपरकिंग्ज खेळाडूंनी हैद्राबादमध्ये बिर्याणीवर असा मारला ताव )

याप्रकरणी आता तुरुंग व्यवस्थापन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गवळीला (Arun Gawali) मुंबईचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर (Kamlakar Jamsandekar) हत्येप्रकरणी तसेच इतर गुन्ह्यांसाठी दोनदा जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळी (Arun Gawali) यांच्यावतीने युक्तिवाद करणारे ॲड. मीर नगमान अली यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने 2006 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षा झालेल्या कैद्याने वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील आणि जर कैदी शारीरिकदृष्ट्या कमकुवत/वृद्ध असेल, तर त्याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी त्याची सुटका करण्याचा विचार केला जाऊ शकतो. अरुण गवळीचे वय 69 वर्षे असून हत्येच्या आरोपाखाली तो 16 वर्षांपासून तुरुंगात आहे. अरुण गवळी (Arun Gawali) यांच्या बाबतीत 2006 च्या शासन परिपत्रकातील दोन्ही अटी पूर्ण होत आहेत. यामुळे उच्च न्यायालयाने गवळीची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. (Arun Gawali)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.