Arthur Road Jail : दोन इंच जागेसाठी कैद्यांची न्यायालयात धाव, मुंबईच्या आर्थर रोड मधील प्रकार 

52
Arthur Road Jail : दोन इंच जागेसाठी कैद्यांची न्यायालयात धाव, मुंबईच्या आर्थर रोड मधील प्रकार 
Arthur Road Jail : दोन इंच जागेसाठी कैद्यांची न्यायालयात धाव, मुंबईच्या आर्थर रोड मधील प्रकार 
कैद्यांना झोपण्यासाठी २×६ फूट जागा बॅरेकमध्ये दिली जाते, त्यातही तुरुंग (Arthur Road Jail) अधिकारी यांनी दोन इंच जागा कमी केल्यामुळे एका कैद्याने थेट तुरुंग अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कैद्यांच्या वैद्यकीय कारण बघून त्याला दोन इंच जागा परत करण्यात यावी असा आदेश तुरुंग प्रशासना दिला होता, मात्र आदेशाचे पालन न झाल्यामुळे न्यायालयाने तुरुंग अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
रामदास रहाणे असे तुरुंगातील बॅरेक मधील २ इंच जागेसाठी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. रहाणे याला २०१७ मध्ये मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने खंडणी प्रकरणात अटक केली होती. दाऊद टोळीशी संबंधित रहाणे याला मोक्का लावण्यात आलेला असून तो सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील बॅरेक ६/४ मध्ये आहे.

तुरुंगातील बॅरेकमध्ये कैद्यांना झोपण्यासाठी २×६ फूट जागा देण्यात येते. तेवढ्याच जागेत कैद्याने आपला बिछाना(अंथरून) लावून झोपायचे. मात्र तुरुंगातील कैद्यांची वाढती संख्या बघून बॅरेकमध्ये वाढलेल्या कैद्यांना झोपण्यासाठी जागा मिळावी म्हणून आर्थर रोड तुरुंगातील बॅरेक क्रमांक ६/४ मधील प्रत्येक कैद्यांची दोन इंच जागा कमी करण्यात आलेली आहे.

(हेही वाचा-गुरु-शिष्य परंपरा जपणारे सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक Pandit Chitresh Das)

आधीच अपुरी जागा त्यात दोन इंच जागा गेल्यामुळे रामदास रहाणे याने दोन इंच जागेसाठी आपल्या वकीलामार्फत विशेष मोक्का न्यायालयात याचिका दाखल केली होती, वैद्यकीय कारण पुढे करून आपली दोन इंच जागा कमी करू असे याचिकेत म्हटले होते.न्यायालयाने गेल्या महिण्यात दिलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांना जागा कमी करू नये आणि शक्य असल्यास रहाणेला दुसऱ्या बॅरेकमध्ये हलविण्यात यावे असे आदेशात म्हटले होते. तुरुंग प्रशासनाने रहाणेला बॅरेक १ मध्ये हलवण्याची तयारी दाखवली परंतु  रहाणे याने ती नाकारली.
रहाणे यांचे वकील, यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादमध्ये म्हटले आहे की,”बॅरेक क्रमांक १ मध्ये दाऊद इब्राहिम कासकरच्या डी-कंपनीशी संबंधित इतर गुंड आहेत आणि जर त्याला बॅरेक क्रमांक १ मध्ये हलवले गेले तर रहाणे त्यांच्या संपर्कात येईल. त्याला अनावश्यकपणे  डी-कंपनीच्या सदस्यांसह इतर प्रकरणात अडकवले जाईल.म्हणून, त्याला बॅरेक क्रमांक १मध्ये हलविण्यात येऊ नये अशी विनंती केली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले की, “रामदास रहाणे याची तब्येत आणि हृदयाचे आजार लक्षात घेऊन, तुरुंग प्राधिकरणाने त्याला झोपण्यासाठी पुरेशी जागा देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु रहाणे याला पुरेशी जागा न मिळाल्याने तसेच तुरुंग अधिकारी यांनी  न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे मंगळवारी पुन्हा रहाणेने तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्ध पुन्हा विशेष न्यायालयात धाव घेतली.राहणेच्या या याचिकेला उत्तर देताना त्यांचे वकील शाह यांनी सांगितले की, न्यायालयाने तुरुंग प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=805y8EmcjYM&t=7s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.