Nitin Desai : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल; पाच जणांची नावे आली समोर

97

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात खालापूर पोलिसांनी एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित इतर पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात एडलवाईज कंपनीचे चेअरमन शहा यांच्यासह कंपनीचे अधिकारी स्मित शहा आणि केयुर मेहता आणि आर के बन्सल यांचा समावेश असून न्यायालयाने दोन्ही पक्षातील कर्जाची विषय सोडविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले जितेंद्र कोठारी यांच्या नावाचा देखील गुन्हयात समावेश आहे.

नितीन देसाई यांनी घेतलेले कर्जाचा आकडा वाढून २५३ कोटीच्या घरात गेला होता. देसाई हे एकरकमी परतावा ( वन टाईम सेटलमेंट) देण्यास तयार होते, मात्र एडलवाईज कंपनी सोबत त्यांच्या भेटी होऊनही होकार किंवा नकार सुद्धा कळवळा जात नव्हता. अशाच प्रकारे भेटींमध्ये वेळ घालवून एडलवाईज कंपनीने कर्जाच्या रकमेवर व्याज वाढण्याची वाट पाहिली आणि ‘एनसीएलटी’ न्यायालयात गेली असा आरोप देसाई यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

न्यायालयाने दोन्ही पक्षातील कर्जाची विषय सोडविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले जितेंद्र कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतू कोठारी यांनी इतर आरोपींशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. एडलवाईज कंपनी एन डी स्टुडिओवर कब्जा करण्याच्या इराद्यात होती, असा आरोप देसाई यांच्या कुटुंबियानी केला आहे. देसाई यांना कर्जा संदर्भात कंपनीने वारंवार बोलण्याचे नाटक केले, परंतु त्यातून कुठलाही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही, अशा प्रकारे देसाई यांना त्रास देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान ‘एनसीएलटी’ न्यायालयाचा आदेश देसाईंच्या विरोधात आल्याने नितीन देसाई खचले होते व त्यांनी अखेर कठोर पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समजते.

(हेही वाचा Transfer : राज्यात 18 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोण आहेत अधिकारी, वाचा यादी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.