Anna University Case : चेन्नईतील अण्णा विद्यापीठातील १९ वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणा(Anna University Case)त महिला न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात अत्याचाराचा आरोप असणाऱ्या ज्ञानशेखरनला ३० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, न्यायालयाने शिक्षा सुनावताना ९० हजारांचा दंडही ठोठावला आहे. सोमवार, ०२ जून दिवशी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.(Anna University Case)
(हेही वाचा Ukraine Attack : युक्रेनचा मास्टरस्ट्रोक रशियावर पडला भारी ! ‘असा’ आखला हल्ल्याचा कट )
दरम्यान, अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या ज्ञानशेखरनवरील सर्व ११ आरोप सिध्द झाले असून न्यायालयाने त्याला दोषी ठरविले आहे. या प्रकरणात न्यायालयाने ०६ महिन्यांत सुनावणी पूर्ण केली असून दोषीला ९० हजारांच्या दंडासह ३० वर्षे तुरूंगात राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे चेन्नई महिला न्यायालयाच्या निकालाला आरोपीकडून उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे आरोपी ज्ञानशेखरनच्या वकिलाने सांगितले आहे.(Anna University Case)
आरोपीच्या वकिलांनी काय म्हटले?
आरोपीचे वकील बीआर जयप्रकाश नारायणन म्हणाले, न्यायालयाने ज्ञानशेखरनला अण्णा विद्यापीठ अत्याचार प्रकरणा(Anna University Case)त सर्व ११ आरोपांमध्ये आरोपी ठरविले आहे. गेल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर शिक्षेचा तपशील आता देण्यात आला आहे. आरोपीस माफीशिवाय ३० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, ९० हजार रुपये दंड देखील ठोठावण्यात आला आहे. या निकालाविरोधात चेन्नई महिला न्यायालयाकडून कागदपत्रे मिळाल्यानंतर उच्च न्यायालयात अपील करणार आहोत, असे आरोपीचे वकील म्हणाले.
#WATCH | Tamil Nadu | On Chennai Mahila court sentencing accused A Gnanasekaran to life imprisonment for at least 30 years and a fine of Rs 90,000 in Anna University rape case, accused advocate BR Jayaprakash Narayanan says, “The court has found Gnanasekaran the accused in Anna… https://t.co/PvtgMvFM1S pic.twitter.com/EMjahztLDy
— ANI (@ANI) June 2, 2025
अण्णा विद्यापीठ अत्याचार प्रकरण नेमकं काय?
चेन्नईतील अण्णा विद्यापीठात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार(Anna University Case) करण्यात आला होता. ही घटना २३ डिसेंबर २०२४ रोजी अण्णा विद्यापीठात घडली होती. १९ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर विद्यापीठात रस्त्यावरील विक्रेत्या ज्ञानशेखरनने अत्याचार केला होता. पीडिता एका ठिकाणी मित्राला भेटायला गेली होती. या दरम्यान, ज्ञानशेखरनने तिचा व्हिडिओ बनवित तिला धमकावले होते. तसेच, तिचा नंबर घेत तिला जिथे बोलावेल तिथे येण्यास सांगितले. या घटनेत जेव्हा मुलीने तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण(Anna University Case) उघडकीस आले होते. विशेष म्हणजे २०११ मध्ये अशाप्रकारची घटना घडली होती. त्यानंतर त्याच्यावर एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक राजकारणदेखील चांगलेच तापले होते. भाजपने सत्ताधारी पक्षावर आरोप करत म्हटले होते की, आरोपी ज्ञानशेखरन डीएमकेचा आशीर्वाद असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.(Anna University Case)
Join Our WhatsApp Community