Amritsar Blast: बॉम्ब ठेवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या हातातच स्फोट; नेमकं काय घडलं? वाचा… 

200
Amritsar Blast : पंजाबमधील अमृतसरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मंगळवारी (२७ मे) पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजिठा रोड (Majitha Road) बायपासजवळ एक मोठा स्फोट झाला. संबंधित व्यक्ती बॉम्ब (Bomb) ठेवण्यासाठी आला होता, त्याचा हातातच बॉम्ब फुटला. या घटनेत त्या व्यक्तीच्या शरीरापासून हात वेगळे झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले असून चौकशी सुरु केली आहे. अमृतसर (Amritsar) ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली. (Amritsar Blast)

(हेही वाचा – Chhatrapati SambhajiNagar Encounter : थरारक घटनेत उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याचा पोलिसांकडून एन्काऊंटर, गुन्हे शाखेला माहिती मिळताच केली कारवाई)

पंजाबमधील अमृतसरामध्ये हा धमका झाला. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास या बॉम्बचा स्फोट (Bomb explosion) झाला. यासंदर्भात पोलिसांकडून अजून काहीही माहिती देण्यात आली नाही. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी गँगस्टर किंवा दहशतवादी गटाने हा बॉम्बस्फोट घडवून आणण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. या स्फोटात संबंधित व्यक्ती ही  भंगार विकणारा असल्याचे सांगितले जात आहे. जुना बॉम्ब तोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप या घटनेबाबत काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
स्थानिक नागरिक काय म्हणतात…
अमृतसरमधील मजीठा रोडवर हा स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच काही जणांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी एक व्यक्ती ओरडत असताना लोकांना दिसला. त्याचे हात पाय तुटल्याचे नागरिकांना दिसले. त्या व्यक्तीची ओळख अजून पटली नाही. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
(हेही वाचा – Chhatrapati SambhajiNagar Encounter : थरारक घटनेत उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याचा पोलिसांकडून एन्काऊंटर, गुन्हे शाखेला माहिती मिळताच केली कारवाई)
स्फोट झाला तो बॉम्ब कोणता होता? त्याची चौकशी सुरु केली आहे. त्या व्यक्तीला तो बॉम्ब कुठून मिळाला होता? त्यासंदर्भातील उत्तरही पोलिसांच्या चौकशीनंतर मिळणार आहे. स्फोटानंतर पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षा दलांना अलर्ट करण्यात आले आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहचले आहे. फोरेन्सिक टीमही घटनास्थळावर दाखल झाली आहे. चौकशी केल्यावर या घटनेची माहिती माध्यमांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.