Priyanka Senapati : युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या (Pakistani espionage) अटकेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर तपास यंत्रणेने सगळीकडे झाडाझडती करण्यास सुरूवात केली आहे. यातच आता आणखी एका युट्यूबरचे नाव समोर आले आहे. ओडिसा येथिल पुरीमधील प्रियंका सेनापती असे संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या या युट्यूबरचे नाव आहे. दरम्यान आयबीने (Intelligence Bureau) अर्थात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून या युट्यूबरची चौकशी करण्यात आली. (Priyanka Senapati)
(हेही वाचा – पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी Jyoti Malhotra चा काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा)
प्रियंका सेनापती ज्योती मल्होत्राला कशी भेटली?
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये ज्योती मल्होत्रा पुरीला गेली होती. याच वेळी तिने जगन्नाथ मंदिर आणि आजूबाजूच्या सरकारी कार्यालयांचे फोटो आणि व्हिडीओ तिने शूट केले होते. या ठिकाणांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांना तिने पाठवल्याचा संशय भारतीय गुप्तचर यंत्रणांना आहे. पुरीला फिरायला गेली, त्याचवेळी प्रियंका आणि ज्योती मल्होत्रा यांची भेट झाली होती. दोघींची भेट आणि संबंधाबद्दल गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. त्यामुळेच आयबीने आता तिची चौकशी केली आहे.
यूट्यूबर प्रियांका सेनापतीचीही चौकशी करण्यात आली
या संदर्भात, पुरीची युट्यूबर प्रियंका सेनापतीची चौकशी केली जात आहे. प्रियांका आणि ज्योतीची भेट युट्यूबच्या माध्यमातून झाली. प्रियांकाची भूमिका फक्त मैत्रीण असण्यापुरती मर्यादित होती की ती माहितीच्या देवाणघेवाणीत सहभागी होती हे तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
(हेही वाचा – Sita Gufa : काय? रावणाने सीतेला याच ठिकाणाहून पळवून नेलं? ती सीता गुंफा महाराष्ट्रात कुठे आहे?)
प्रियांका सेनापती दिले स्पष्टीकरण
प्रियांका सेनापतीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टीकरण दिले आणि लिहिले की, ‘ज्योती माझी फक्त एक मैत्रीण होती आणि आम्ही युट्यूबद्वारे भेटलो होतो. तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काही माहिती नाही. जर मला माहित असतं की ती देशाविरुद्ध हेरगिरी करत आहे, तर मी कधीही संपर्कात राहिली नसती.
तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आश्वासन
तिने पुढे लिहिले की, ‘मी तिला फक्त कंटेंट निर्मितीच्या व्यावसायिक क्षेत्रात ओळखत होते आणि ही बातमी ऐकून मला स्वतःला धक्का बसला आहे.’ जर कोणत्याही तपास संस्थेला माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर मी पूर्ण सहकार्य करेन.
(हेही वाचा – Mumbai Airport : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ५.१ कोटीचे सोने जप्त, २ जणांना अटक)
सुरक्षा संस्था सतर्क
या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच सोशल मीडिया आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर सामान्य वाटणारे कंटेंट क्रिएटर्स अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होत आहेत ही चिंतेची बाब बनली आहे. या प्रकरणात अजूनही चौकशी सुरू आहे. येत्या काही दिवसांत आणखी खुलासे आणि अटक होण्याची शक्यता आहे. तसेच, सरकार आता डिजिटल देखरेख अधिक कडक करण्याची तयारी करत आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना रोखता येतील.
(हेही वाचा – ‘IMF’चा पाकिस्तानला दणका; कर्ज तर दिलं पण आता लादल्या ‘या’ ११ अटी, वाचा संपूर्ण बातमी)
हरियाणा राज्यातून ‘या’ दोघांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक
दरम्यान पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याऱ्या आरमान नामक तरुणाला हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी नूंह जिल्ह्यातील अटक केली आहे. तसेच हरियाणाच्या हिस्सारमधून ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर तपास यंत्रणेने सगळीकडे झाडाझडती करण्यास सुरूवात केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community