Afghanistan Citizen Infiltration : बांग्लादेशीसह अफगाणी नागरिकांची मुंबईत घुसखोरी

हबीबुल्ला प्रांग (३८) असे अटक करण्यात आलेल्या अफगाणी नागरिकाचे नाव असून हबीबुल्ला प्रांग हा वडाळ्यात झहीर खान नावाने २००७ पासून बेकायदेशीररित्या राहत होता. त्याने भारतीय असल्याची बनावट कागदपत्रेदेखील तयार केली होती. त्यात पॅनकार्ड, वाहन परवाना यांचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

130
Abhishek Banerjee : डेव्हिड हेडलीला शिवसेना भवन फिरवणाऱ्या राजाराम रेगेला माहीम येथून अटक

बांग्लादेशी नागरिकांसह (Bangladeshi Citizen) मुंबईत अफगाणी नागरिकांची घुसखोरी (Afghanistan Infiltration) वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात अफगाण नागरिक (Afghanistan Citizens) नाव बदलून तसेच बोगस कागदपत्रे (Fake Document) तयार करून वास्तव्य करीत असल्याची धक्कादायक माहिती मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) केलेल्या कारवाईत समोर आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पथकाने वडाळा येथील नॅशनल मार्केट येथून ३२वर्षीय अफगाणी नागरिकाला बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचा आरोपावरून अटक केली आहे. (Afghanistan Citizen Infiltration)

हबीबुल्ला प्रांग (३८) असे अटक करण्यात आलेल्या अफगाणी नागरिकाचे नाव असून हबीबुल्ला प्रांग हा वडाळ्यात झहीर खान नावाने २००७ पासून बेकायदेशीररित्या राहत होता. त्याने भारतीय असल्याची बनावट कागदपत्रेदेखील तयार केली होती. त्यात पॅनकार्ड, वाहन परवाना यांचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई पोलिसांकडून मागील काही महिन्यांपासून मुंबईत बेकायदेशीर (Illegal) राहणाऱ्या बांग्लादेशी यांच्यावर कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान बांग्लादेशी नागरिकांसह अफगाणिस्तान देशातील नागरिक देखील मुंबईत मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांकडून कक्ष ५ च्या पथकाला (Crime Branch Unit 5) कारवाईचे आदेश देण्यात आले होते. (Afghanistan Citizen Infiltration)

(हेही वाचा – Artificial Intelligence : भारतातील ५ आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्या)

छापा टाकून हबिबुल्ला याला घेतले ताब्यात 

कक्ष ५ च्या पथकाने खबऱ्यांमार्फत अफगाणी नागरिकांची माहिती काढत असताना एक अफगाणी नागरिक वडाळा येथील नॅशनल मार्केट (National Market In Wadala) या ठिकाणी बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष ५च्या पथकाने बुधवारी रात्री नॅशनल मार्केट परिसरात एका घरात छापा टाकून हबिबुल्ला याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने प्रथम पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्याने त्याचे नाव झहीर खान असे सांगून तो भारतीय असल्याचे पुरावे गुन्हे शाखेकडे सादर केले. त्याने सादर केलेल्या पॅनकार्ड, वाहन परवाना या कागदपत्रांची पडताळणी केली असता ही कागदपत्रे बोगस असल्याची आढळून आली. (Afghanistan Citizen Infiltration)

त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे खरे नाव हबीबुल्ला प्रांग असे असल्याचे सांगून २००७ मध्ये तो अफगाण देशातून भारतात बेकायदेशीररित्या आला होता. अफगाणिस्तान (Afghanistan Infiltration) मधील जिल्हा झुरामत, पक्तिया प्रांत येथे राहणारा आहे. बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या हबीबुल्ला प्रांग याने मुंबईत बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःचे नाव बदलून झहीर खान असे ठेवले होते. गुन्हे शाखाने रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. (Afghanistan Citizen Infiltration)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.