
मुंबईत वेगवेगळ्या मार्गाने बेकायदेशीररित्या प्रवेश करून येथे वास्तव्यास आलेल्या बांग्लादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi infiltrator) मुंबई पोलिसांनी जोरदार मोहिम हाती घेतली आहे. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांच्या कठोर निर्देशांनंतर दोन दिवसांत २९५ बांग्लादेशी नागरिकांना त्यांच्या देशात रवानगी करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १४५ बांग्लादेशींना, ज्यात ७० महिलांचा समावेश होता, थेट त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी आणखी १५० घुसखोरांना डिपोर्ट करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ज्या नागरिकांविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींना थेट डिपोर्ट करण्यात येत आहे. मात्र, ज्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल आहेत, त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांना परत पाठवले जात आहे. (Bangladeshi infiltrator)
(हेही वाचा – BMC : रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामावर उपनगराचे पालकमंत्री नाखुश, प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश)
बँक खाते, दस्तावेज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू मुंबई पोलिसांच्या अॅन्टी टेररिझम स्क्वॉडने (ATS) अशा घुसखोरांना नकली कागदपत्रं देणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. अनेक बँक खात्यांमधून आर्थिक व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, मुंबईतील विविध भागांतील बँक खात्ये (Bank Account) बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. याशिवाय राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससारखे कागदपत्रही रद्द करण्यासाठी संबंधित खात्यांशी संपर्क सुरू आहे.
कायद्याची मदत घेऊन संपत्तीचा तपास अनेक बांग्लादेशी नागरिकांनी अवैधरीत्या वास्तव्यास राहून मुंबईत नोकरी करत मोठ्या प्रमाणात संपत्ती उभी केली आहे, असा पोलिसांचा संशय आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई केली जात आहे. (Bangladeshi infiltrator)
आकडेवारीनुसार कारवाईचा वेग वाढलेला
मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या पहिल्या ४ महिन्यांत ६५० बांग्लादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrator) अटक करण्यात आली असून त्यापैकी २९५ जणांना डिपोर्ट करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांची प्रक्रिया सुरू आहे. तुलनात्मकदृष्ट्या, २०२४ मध्ये फक्त ३५० जणांना अटक झाली होती, आणि त्यातील १०० जणांना डिपोर्ट करण्यात आले होते.
मुंबई पोलीस आता या घुसखोरी प्रकरणांवर अधिक कडक पावले उचलण्याच्या तयारीत असून, त्यासाठी केंद्रीय यंत्रणांशी समन्वयात काम सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community