आमदार Chhagan Bhujbal यांच्या स्वीय सहाय्यकाकडे १ कोटींची खंडणी मागणारा आरोपी जेरबंद

121
Chhagan Bhujbal: आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ च्या पथकाने करंजाळी येथील हॉटेलमध्ये सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. (Chhagan Bhujbal)

(हेही वाचा – Jain Temple : विलेपार्ले जैन समाजाच्या मंदिरासाठी तात्पुरत्या शेडला न्यायालयाचा हिरवा कंदील)

त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडण्याची दिली धककी
स्वीय सहाय्यक गायकवाड यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकांवरून वारंवार फोन येत होते. फोन करणारा इसम स्वतःला आयकर अधिकारी सांगून त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार असल्याची धमकी देत मदतीच्या मोबदल्यात १ कोटी रुपये मागत होता. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी त्याने गायकवाड यांना दिली होती. मात्र स्वीय सहाय्यक यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik CP) यांना दिली. त्यानंतर पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत गायकवाड यांना गुजरातच्या धरमपूर येथे बोलावून आरोपीस पैसे देण्यासाठी आणण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी डमी नोटा आणि काही खरी रक्कम पंच साक्षीदारांच्या माध्यमातून आरोपीकडे देण्याचे ठरवले.

(हेही वाचा – Delhi AAP ला धक्का: १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा; MCD मध्ये वेगळा गट स्थापन करण्याची केली घोषणा)

असा रचला सापळा
धरमपूर येथे आरोपीची वाट पाहूनही तो न आल्याने पथक परतीच्या मार्गावर असताना आरोपीने पुन्हा संपर्क साधून करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे येण्यास सांगितले. येथे सापळा लावून पोलीसांनी संशयित आरोपी राहुल दिलीप भुसारे (वय २७, रा. करंजाळी, ता. पेठ) यास रंगेहाथ अटक केली. आरोपीकडून एक होंडा शाईन मोटारसायकल, मोबाईल फोन, ५०० रुपयांच्या ६० खऱ्या नोटा, तसेच खेळण्यातल्या नोटांचे १५ बंडल (एकूण अंदाजे ८५,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल) जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.