संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात कोल्हार-घोटी राज्यमार्गावर आज रविवारी (दि. 15) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात (Accident News) झाला. ट्रॅव्हल्स अन् ट्रकच्या या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्स आणि आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. (Accident News)
हेही वाचा-इस्रायल-इराण धुमसत असताना Kim Jong Un यांचा अधिकाऱ्यांना मोठा आदेश !
या अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की, ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Accident News)
हेही वाचा- Kedarnath Helicopter Crash: केदारनाथच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले ; ७ जणांचा मृत्यू !
स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे (Accident News) कोल्हार-घोटी राज्यमार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community