मध्य प्रदेशातील (Accident News) झाबुआ जिल्ह्यात सिमेंटने भरलेला ट्रेलर ट्रक एका व्हॅनवर उलटल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. लग्नावरून परतत असताना काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडला. (Accident News)
हेही वाचा-Corona Update: महाराष्ट्रात मंगळवारी ५९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ! ४९४ सक्रिय रुग्ण
झाबुआचे पोलीस अधीक्षक पद्मविलोचन शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मेघनगर तहसील क्षेत्रातील संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील रस्त्यावरून ट्रक बांधकामाधीन रेल्वे ओव्हर-ब्रिज (आरओबी) ओलांडत असताना त्याचा तोल गेला आणि तो व्हॅनवर उलटला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले.” (Accident News)
नेमकं काय घडलं ?
पहाटे २.३० च्या सुमारास एकाच कुटुंबातील मृत लग्न समारंभातून परतत होते. सिमेंटने भरलेला ट्रेलर ट्रक तोल गेला अन् व्हॅनवर उलटला. यात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि इतर दोघे जखमी झाले. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community