Nashik : नाशिकमधील आदिवासी वसतीगृहात धक्कादायक प्रकार, अल्पवयीन विद्यार्थिनींशी केले गैरवर्तन

121
नाशिकमधील आदिवासी वसतीगृहात धक्कादायक प्रकार, अल्पवयीन विद्यार्थिनींशी केले गैरवर्तन
नाशिकमधील आदिवासी वसतीगृहात धक्कादायक प्रकार, अल्पवयीन विद्यार्थिनींशी केले गैरवर्तन

नाशिकमधील इगतपुरीच्या चिखलवाडीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदिवासी मुलींच्या खासगी वसतीगृहातील अल्पवयीन विद्यार्थिनींना धमकावून हॉटेलमध्ये नाचवल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून त्या वसतीगृहाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे. या घटनेविषयी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे येथे एका खाजगी संस्थेची काही वर्षापासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यावर्षी मुलींसाठी हे वसतीगृह सुरु करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Heavy Rainfall : उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)

आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनींना दमदाटी करुन जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले. याप्रकरणी संशयित शिक्षक राजू नाईक आणि संशयित शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा संपूर्ण तपास नाशिक ग्रामीणचे उप अधीक्षक संदिप भामरेंकडे देण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.