Abhishek Ghosalkar Firing : बोरिवली गोळीबाराने हादरली; शिवसेना नगरसेवकावर गोळीबार करणारा मॉरिसवर होते गंभीर गुन्हे

656
Abhishek Ghosalkar Firing : बोरिवली गोळीबाराने हादरली; शिवसेना नगरसेवकावर गोळीबार करणारा मॉरिसवर होते गंभीर गुन्हे
Abhishek Ghosalkar Firing : बोरिवली गोळीबाराने हादरली; शिवसेना नगरसेवकावर गोळीबार करणारा मॉरिसवर होते गंभीर गुन्हे

मुंबई- ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व विधानसभा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या दालनात गोळीबार केला होता या गोळीबारात महेश गायकवाड सह दोन जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच गुरुवारी सायंकाळी मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे गोळीबाराची दुसरी घटना घडली.

मॉरिस नोरोन्हा उर्फ भाई या गुंडाने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निमित्ताने आमंत्रित केले, व स्वतःच्या कार्यालयात फेसबुक लाईव्ह मध्ये “आमच्यातील वैर संपले, आम्ही एकत्र येऊन काम करू, असे सांगत असतानाच स्वतःकडे असलेल्या पिस्तुल मधून अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार केला त्यानंतर स्वतःवर ४ गोळ्या झाडून स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) आणि गुंड मॉरिस नोरोन्हा उर्फ भाई या दोघांचा मृत्यू झाला. एका आठवड्यात घडलेल्या या दोन घटनांनी संपूर्ण महाराषष्ट्राला हादरवुन सोडले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन घटनांचे गोळीबार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोण होता मॉरिस नोरोन्हा…

बोरिवली पश्चिम आयसी कॉलनी येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या गोळीबारातील घटनेतील आरोपी मॉरिस नोरोन्हा उर्फ भाई हा गुंड प्रवृत्तीचा होता, २०१४ मध्ये एका विवाहित महिलेला ब्लॅकमेलिंग, बलात्कार, फसवणूक आणि धमकावणे दाऊद टोळीच्या गुंडांची धमकी देणे या सारखा गंभीर गुन्हा २०२२ मध्ये एमएचबी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाला त्या वेळी मॉरिस यूएस मध्ये होता,त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आले होते. भारतात परतताच त्याला एमएचबी पोलिसांनी विमानतळावर अटक केली होती. या सर्व प्रकरणा मागे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे असल्याच्या संशयावरून मॉरिस सुडाने पछाडला होता अशी चर्चा गोळीबाराच्या घटनेच्या दिवशी स्थानिकामध्ये सुरू होती. मॉरिस भाई याने दहा दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, “तुम्ही अशा माणसाला पराभूत करू शकत नाही ज्याला वेदना, नुकसान, अनादर, हृदयविकार आणि नकार याची पर्वा नाही” या दोन्हीचा सबंध या घटनेशी आहे का याचा तपास पोलीस करीत आहे. (Abhishek Ghosalkar Firing)

(हेही वाचा – Bengal : महिला कैदी गर्भवती होण्याचे प्रमाण वाढले; कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका)

मनपा निवडणूकीसाठी इच्छुक होता मॉरिस …

मॉरिस नोरोन्हा आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छूक होता,त्याचे विविध राजकीय पक्षातून तिकीट मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्याच्या संपर्कात होता तसेच स्थानिक पातळीवर समाजकार्य कामे करीत होता. मौरीस याने सोशल मिडियावरील स्वतःच्या सर्व फोटो खाली ‘व्होट फॉर मौरीस’ असे लिहले होते. (Abhishek Ghosalkar Firing)

बोरिवलीत कडक पोलीस बंदोबस्त …

बोरिवली पश्चिम येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने बोरिवलीसह संपूर्ण मुंबई हादरली. घटनास्थळाला सहपोलिस आयुक्त (कावसु) सत्यनारायण चौधरी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन हे देखील घटनास्थळाची पहाणी करून गेले. घटनास्थळ, करुणा रुग्णालय या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे. (Abhishek Ghosalkar Firing)

गुन्हा दाखल ….

बोरिवलीतील एमएचबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे रुग्णालय आणि शताब्दी रुग्णालय येथे पाठविण्यात आले. रुग्णालयात इंक्वेस्ट पंचनामा करून रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू होते. (Abhishek Ghosalkar Firing)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.