-
प्रतिनिधी
‘स्किझोफ्रेनिया’ या आजाराने ग्रस्त असलेल्या २२ वर्षीय तरुणीने राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना विक्रोळी पूर्व येथे घडली. एवढ्या उंचावरून ही तरुणी एका मोटारसायकलवर पडली आणि तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. (Suicide)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी वाणिज्य शाखेची पदवीधर होती. ती आई – वडील आणि मोठ्या भावासोबत राहत होती. विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथील आदित्यराज इमारतीत राहण्यास होती. तिला स्किझोफ्रेनिया हा आजार झाला होता. ती खाजगी तसेच परळच्या मनपा रुग्णालयात उपचार घेत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खाली पडल्याचा आवाज झाल्याने इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. (Suicide)
(हेही वाचा – US Student Visa : अमेरिकेची डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई; सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणी कडक)
इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या एका मोटारसायकलच्या शेजारी एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. सुरक्षा रक्षकांनी ही बाब रहिवाश्याच्या लक्षात आणून दिली. रहिवाश्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता ही तरुणी त्याच इमारतीत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. (Suicide)
पोलिसांनी इमारतीत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ही तरुणी इमारतीच्या गच्चीवरून उडी मारताना आढळून आली. “आम्हाला कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही पण प्राथमिक तपासात कोणताही संशय नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती टेरेसवरून उडी मारताना दिसली”, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आणि अपघाती मृत्यूचा अहवाल (एडीआर) नोंदवण्यात आला आहे आणि तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Suicide)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community