-
प्रतिनिधी
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) बंगल्यात अनोळखी तरुण घुसल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सलमान खानचा (Salman Khan) चाहता असल्याचे हा तरुण सांगत असला तरी पोलीस त्याची कसून चौकशी करीत असल्याचे कळते.
(हेही वाचा – Covid JN.1 Varient : भारतात नव्या व्हेरिएंटचे २५७ रुग्ण; काय आहे देश-विदेशातील सद्यस्थिती जाणून घ्या)
जितेंद्रकुमार सिंह असे या संशयित तरुणाचे नाव नाव आहे. सिंह हा मूळचा छत्तीसगडचा राहणारा आहे. मंगळवारी सकाळपासून हा तरुण सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट भोवती घिरट्या मारत होता. सायंकाळी त्याने थेट बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. या संशयित तरुणाला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून वांद्रे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी (ट्रेसपासिंग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – ICC Champions Trophy : यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स करंडकाने मोडले प्रक्षेपणातील सर्व विक्रम)
त्याची चौकशी केली असता त्याचे नाव जितेंद्रकुमार सिंह असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच तो छत्तीसगडचा राहणारा असून तो सलमान खानचा (Salman Khan) चाहता आहे. तो सलमान खानला भेटण्यासाठी छत्तीसगड येथून आला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत असून त्याचा उद्देश काय होता, कुठल्या टोळीशी त्याचा संबंध आहे का? याबाबत चौकशी करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community