Nashik Crime : येवल्यात पोलिसांसह गोरक्षकांवर २०० जणांच्या जमावाने केला दगड- विटांनी हल्ला !

Nashik Crime : येवल्यात पोलिसांसह गोरक्षकांवर २०० जणांच्या जमावाने केला दगड- विटांनी हल्ला !

97
Nashik Crime : येवल्यात पोलिसांसह गोरक्षकांवर २०० जणांच्या जमावाने केला दगड- विटांनी हल्ला !
Nashik Crime : येवल्यात पोलिसांसह गोरक्षकांवर २०० जणांच्या जमावाने केला दगड- विटांनी हल्ला !

येवला-नांदगाव मार्गावर (Nashik Crime) संमदनगर वसाहतीतील बर्फ कारखान्याजवळ चार ते पाच घरांत गोवंशाची अवैध कत्तल केली जाते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली. याची माहिती गोरक्षकांनी पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांना शनिवारी सायंकाळी दिली. रविवारी सकाळी कारवाईसाठी सोबत पोलिस द्या, अशी विनंती केली. रविवारी सकाळी साडेसातला वसाहतीत १५ ते २० गोरक्षकांसह तीन पोलिस गेले. (Nashik Crime)

हेही वाचा-BJP shared a video : विरोधकांची केली बोलती बंद ; “आत्ता कुठे सुरुवात…!” म्हणत भाजपाने व्हिडीओ शेअर करत स्पष्टच सांगितलं

कत्तलीसाठीच्या खोल्यांची पाहणी करत असताना एका खोलीतून एक जण पिशवीत काहीतरी घेऊन दुचाकीवरून पळाला. दोन पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग केला. गोरक्षक इतर खोल्यांची तपासणी करतानाच २०० ते २५० लोकांचा जमाव गोरक्षक व पोलिसांवर धावून आला. गोरक्षक अमोल दाणे व कमलाकर खेरुड यांची दुचाकी बंद पडली. यामुळे काही जणांनी हत्यारांसह दाणे व खेरुड याच्या जमावाने हल्ला केला. जखमींना उपजिल्हा रुग्णालय व गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.(Nashik Crime)

हेही वाचा- CM Devendra Fadnavis : जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली लागणार

या हल्ल्यात २ गोरक्षक गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले. यातील दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक तळ ठोकून होते. हिंदुत्ववादी संघटनांनी विंचूर चौफुलीवर ठिय्या मारत आरोपींना २४ तासांत अटकेची मागणी करत तहसीलदार आबा महाजन व उपअधीक्षक बाजीराव महाजन यांना निवेदन दिले. (Nashik Crime)

हेही वाचा- २५ वर्षांत मुंबईची पाणी समस्या सोडवण्यात अपयशी ठरलो; Shivsena UBT ची अप्रत्यक्ष कबुली

पोलिस आणि गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या जमावातील संशयितांच्या शोधासाठी पथक तयार केले आहेत. गोवंश हत्येला बंदी असताना छुप्या पद्धतीने हत्या सुरू आहे. गो रक्षकांनी यापूर्वीही शहरात होणारी गो तस्करी हाणून पाडली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. (Nashik Crime)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.