Crime : मामा चोर म्हणाला म्हणून १६ वर्षांच्या मुलाने वाहनांची केली तोडफोड

356
Crime : मामा चोर म्हणाला म्हणून १६ वर्षांच्या मुलाने वाहनांची केली तोडफोड
  • प्रतिनिधी

मामा चोर म्हणाला म्हणून संतापलेल्या १६ वर्षांच्या विधीसंघर्ष बालकाने हातात तलवार घेऊन भररस्त्यात नागरिकांना धमकावत बेस्ट बससह इतर वाहनांची तोडफोड केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भांडुप पश्चिम येथे घडली. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेला विधीसंघर्ष बालक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime)

(हेही वाचा – मालाड मालवणीतील अनधिकृत बांधकामांप्रकरणी Piyush Goyal यांनी महापालिका आणि पोलिसांना दिले ‘हे’ आदेश)

भांडुप पश्चिम येथील टॅंक रोड येथे शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक तरुण हातात तलवार घेऊन रस्त्यावर लोकांना शिवीगाळ धमक्या देत होता. त्याने रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या रिक्षा तसेच इतर वाहनांची तलवारीने तोडफोड केली. एवढ्यावर न थांबता त्याने प्रवाशांनी भरलेली बेस्ट बस थांबवली. बस चालकाला शिवीगाळ करीत त्याने बसच्या पुढच्या काचा तोडल्या तसेच बसमध्ये चढून प्रवाशांना धमक्या देऊ लागला. हा सर्व प्रकार अनेक जण आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करीत होते. (Crime)

(हेही वाचा – Jain Temple Action : अखेर संबंधित सहायक आयुक्ताची बदली)

या घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी टॅंक रोड येथे धाव घेऊन तलवारीसह या तरुणाला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केल्यावर समजले की, हा तरुण १६ वर्षाचा विधीसंघर्ष बालक आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे चौकशी केली असता मामा मला चोर म्हणाला म्हणून माझे डोके फिरले होते असे त्याने पोलिसांना सांगितले. भांडुप पोलिसांनी विधीसंघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) विजयकांत सागर यांनी दिली. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.