Fraud : वाहन भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून १,३७५ जणांची फसवणूक; दोघांना अटक

60
Fraud : वाहन भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून १,३७५ जणांची फसवणूक; दोघांना अटक
  • प्रतिनिधी 

वाहन भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून जवळपास १,३७५ जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथून दोघांना अटक करण्यात आली आहे. संदीप कांदळकर उर्फ ​​राजू राजीव जोशी आणि सचिन तेतागुरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून २५ कोटी रुपयांच्या २४६ मोटारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार कांदळकर हा आरोपी विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट येथून पिक-अप आणि ड्रॉप सेवा यासाठी मोठ्या प्रमाणात भाड्याच्या वाहनांची आवश्यकता असते. आम्ही त्यांना भाडे तत्वावर मोटारी पुरवतो, प्रत्येक वाहनामागे महिन्याला ५५ ते ७५ हजार रुपये भाड्यापोटी मिळतात, असे सांगून व्यवसायात गुंतवणूक करण्यास अनेकांना प्रवृत्त करत होते. (Fraud)

(हेही वाचा – Pakistan च्या उत्पादनांना भारतात नो एन्ट्री; मोदी सरकारचा आणखी एक अटॅक)

या व्यवसायात गुंतवणूक केल्यास किंवा पिक-अप आणि ड्रॉप सेवेसाठी स्वतःच्या गाड्या भाड्याने दिल्यास त्यांना दरमहा ५५ ते ७५ हजार रुपयांची कमाई होईल असे सांगण्यात आले. आरोपींनी जवळपास १,३७५ गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या पैशातून महागड्या कार आणि एसयूव्ही खरेदी केल्या. या टोळीने सुरुवातीला वचन दिलेल्या रकमा त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या परंतु लवकरच ते पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबई आणि आसपासच्या भागातून २४६ वाहने जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. जप्त केलेल्या वाहनांमध्ये इनोव्हा क्रिस्टा, मारुती ब्रेझा, बोलेरो पिकअप, किआ क्रेटा, मारुती एर्टिगा आणि महिंद्रा थार सारख्या कारचा समावेश आहे. (Fraud)

(हेही वाचा – निवृत्ती घ्या, नवं नेतृत्व तयार करा; Ajit Pawar यांनी नक्की कोणाला दिला सल्ला ?)

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या काही साथीदारांचीही ओळख पटवली आहे. दिव्यता म्हात्रे (२६) आणि रोहन म्हात्रे (३५) दोघेही मीरा रोड येथील रहिवासी आहेत. प्रवीण तेलंग (४४) ळा भाईंदर येथील रहिवासी असून वैशाली धुरी (४७) मुंबईतील चारकोप तर नीलेश शिंदे (३८) हा माटुंगा पूर्व येथे राहणारा आहे, आणि बाबू मारुती आवाड (४९) नवी मुंबई येथे राहणारा आहे. मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे म्हणाले की, आरोपींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत फसवणूक आणि विश्वासघाताचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचे सदस्य असल्याचा आरोप आहे. कारण तपासात असे दिसून आले आहे की, ही टोळी प्रदीर्घकाळापासून आर्थिक फसवणूक करत आली आहे. (Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.