हिंदुत्ववादी विचारांच्या भाजपाशी फारकत घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हापासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे, शिवसेना वैचारिक पातळीवर संभ्रमित झाली आहे, अशी टीका होऊ लागली. याला पुष्टी देणारी आणखी एक घटना घडली आहे. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच संभाजी ब्रिगेडने स्थापनेपासून समाजात ब्राह्मणद्वेष पसरवण्यासाठी कायम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर अश्लाघ्य टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी कधीही जातपात मानली नाही, शिवसेनेत कधीही जातपात बघितली नाही, पण तो पक्ष आज इतका रसातळाला गेला आहे की त्यांनी संभाजी ब्रिगेड सारख्या जातीयवादी संघटनेसोबत हातमिळवणी केली आहे, यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण गोष्ट नाही. संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने कायम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा द्वेष केला आहे. त्या संभाजी ब्रिगेडला शिवसेनेने जवळ केले आहे.
– संदीप देशपांडे, मनसे नेते.
शिवसेना जातीयवादी बनली का?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे स्नेहपूर्ण संबंध सर्वश्रुत होते. हे दोन्ही महान व्यक्तिमत्व एकमेकांचा नितांत आदर करत असत. या दोघांचे कौटुंबिक संबंध होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवकालीन इतिहासाचे दस्तऐवज शोधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास लिहिला त्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम कौतुक करायचे. तो इतिहास खोटा, जातीयवादी, मराठाद्वेषी आणि ब्राह्मणांचे उदोउदो करणारा आहे, अशी टीका जातीयवादी संभाजी ब्रिगेड करत आहे. त्या संभाजी ब्रिगेडचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेकदा समाचार घेतला होता. त्या संभाजी ब्रिगेडसोबत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची तथाकथित निधर्मीवादी, मुसलमानांशी लांगुलचालन करणे ही विचारधारा स्वीकारली, अशी टीका होत होती, आता उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडची जातीयवादी, ब्राह्मणद्वेषी विचारधाराही स्वीकारली आहे का, अशी टीका होऊ लागली आहे.
(हेही वाचा अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन कोसळले, जे.जे. रुग्णालयात दाखल)
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले.
Join Our WhatsApp Community