बेस्ट ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते. याच बेस्टच्या महापालिकाकरणाला ७ ऑगस्टला ७५ वर्ष पूर्ण झाली. मुंबईकरांचा प्रवासा अधिक आरामदायी आणि सुखर व्हावा यासाठी बेस्टमध्ये अनेक बदल करण्यात आले. बेस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बेस्टने प्रवासांसाठी अनेक सुविधा सुरू केल्या आहे. बेस्टच्या प्रीमियम सेवेत अत्याधुनिक सेफ्टी फिचरचा समावेश करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : MSRTC : गणेशोत्सवाची ‘एसटी’क काळजी; कोकणात जाणाऱ्यांसाठी २५ ऑगस्टपासून २ हजार ३१० अतिरिक्त बसेस)
महिला प्रवाशांचा सुरक्षित प्रवास
बेस्टच्या या सेफ्टी फिचरमुळे महिला प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होईल. बेस्टच्या या फिचरमध्ये महिला प्रवासी घरी सुखरूप पोहचेपर्यंत ट्रॅक घेतला जाणार आहे. या सेवेसाठी बेस्टने प्रिमियम बस डिझाईन केल्या आहेत. या बसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला खास प्राधान्य देण्यात आले आहे.
सेफ्टी फिचर सुविधा
यासाठी बेस्टने काही प्रिमियम बस डिझाईन केल्या आहेत. या बसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला खास प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी अत्याधुनिक सेफ्टी फिचरचा समावेश करण्यात येणार आहे. बेस्टच्या या फिचरमध्ये महिला प्रवासी घरी सुखरुप पोहोचेपर्यंत नियंत्रण कक्षातील बेस्टचे कर्मचारी मागोवा घेणार आहेत. याद्वारे बसथांब्यापासून घरी जाताना महिलांच्या फोनवर एक संदेश दिला जाईल, या संदेशाला ओके असा प्रतिसाद आला तर संबंधिक महिला घरी पोहोचली असे मानण्यात येईल जर काहीच प्रतिसाद आला नाही तर प्रवासी महिलेने दिलेल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नंबरवर फोन करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही फायदा
सेफ्टी फिचर महिलांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठीही अत्यंत उपयोगी असणार आहे. याद्वारे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुद्धा अधिक सुरक्षित होईल अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र यांनी दिली आहे.
येत्या सप्टेंबरपासून बेस्टची ही प्रिमियम सेवा सुरू होणार असून यात तुम्हाला तुमचे आसन आगाऊ बुक करण्याची सुविधा सुद्धा दिली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community