राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय युध्द स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. एअर कोमोडोर सुनिल तोमर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे आणि भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यपालांनी राष्ट्रीय युध्द स्मारकाच्या केंद्रस्थानी स्थित ‘अमर जवान ज्योतीला’ पुष्पचक्र अर्पण करून भारत देशाच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली.
दरम्यान, राज्यपालांनी बुधवारी (दि.१७ ऑगस्ट) नवनियुक्त उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची उपराष्ट्रपती निवास येथे सदिच्छा भेट घेतली. तसेच,माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची १२,जनपथ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.