संपूर्ण देशभरात आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आहे. यावेळी प्रथमच स्वदेशी तोफांची सलामी देण्यात आली आहे. त्यानंतर मोदींनी देशवासियांना संबोधित करताना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान मोदींनी नवव्यांदा ध्वजारोहण केले. यंदा मोदींनी स्वातंत्र्य दिनी 1 तास 22 मिनिटं 32 सेकंदांचं भाषण करत स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. आतापर्यंत मोदींनी लाल किल्ल्यावरून दीड तासांचे भाषण करत सर्वाधिक वेळ भाषण करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. अशातच मोदींनी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी 1 तास 22 मिनिटे 32 सेकंदाचं भाषण केले.
(हेही वाचा – Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो ध्वज! काय आहे फरक?)
दरवर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान लालकिल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात. 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला होता तेव्हा भारत देशाचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी 72 मिनिटे भाषण केल होत. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचं 2016 साली मोठे भाषण केल होत. 2014 पासून मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील भाषणात तीन वेळा 90 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बोलले होते. तर 2017 साली ते सर्वात कमी म्हणजे 56 मिनिटे बोलले होते. तर 2018 मध्ये 83 मिनिटे, 2019 मध्ये 92 मिनिटे, 2020 मध्ये 90 मिनिटे, तर 2021 मध्ये 88 मिनिटांचे भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

यावेळी मोदींनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. यामध्ये भ्रष्टाचार, महिला, शिक्षण, कृषि, तंत्रज्ञान, विकसित भारत, नागरिकांची कर्तव्ये, डिजिटल भारत अशा वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांनी विचार व्यक्त केले आहेत.
Join Our WhatsApp Community