मध्य रेल्वेवर रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
- सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत माटुंगा – मुलुंड धिम्या मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील व शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबून मुलुंडहून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
- ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत धिम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील व मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील, पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- पनवेल- वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
(बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) - पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
- पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.
विशेष गाड्या
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा सुरू असेल.
- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन सेवा सुरू असतील.