नॉट रिचेबल झाल्यानंतर शिंदेंची पहिली FB पोस्ट, म्हणाले, “… आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग”

92

शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर रातोरात नॉटरिचेबल झाले आहेत. नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे हे गुजरातच्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान त्यांची एक फेसबुक पोस्ट देखील व्हायरल होत आहे.

काय केली पहिली पोस्ट

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. #योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…असे त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे. एकीकडे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात असताना देशभर जागतिक योग दिवस देखील उत्साहात साजरा केला जात असल्याचे दिसतेय.

शिवसेनेच्या गोटात भीतीचे वातावरण

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवत महाविकास आघाडीला अस्मान दाखवल्यानंतर मध्यरात्री शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेची १२ ते १३ मते फुटल्याची शक्यता असल्याने ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, तातडीने बोललेल्या या बैठकीत शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांसह मंत्री असलेले आमदारही गैरहजर राहिले होते, अशी माहिती मिळत आहे. या बैठकीसाठी अनेक आमदारांशी पक्षाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद किंवा नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.