केतकीच्या मदतीला केंद्रीय महिला आयोग, पोलीस महासंचालकांना नोटीस

121

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात केतकी चितळे हे नाव चर्चेत आहे. शरद पवारांसंदर्भात केलेली आक्षेपार्ह पोस्टमुळे केतकी चितळेची जेलवारी सुरू आहे. यानंतर केतकी चितळेने आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा उच्च न्यायालयात करत दारं ठोठावली आहे. मात्र आता केतकीला या प्रकरणात केंद्रीय महिला आयोगाने मदत करत त्याची दखल देखील घेतली आहे. केंद्रीय महिला आयोगाने यासंदर्भातील एक नोटीस राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना बजावली आहे.

पोलिसांच्या अडचणी वाढणार?

ही नोटीस बजावल्यानंतर पोलीस महासंचालकांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेल्याचे दिसून येत आहे. महिला आयोगाने ही नोटीस दिल्यानंतर केतकीच्या प्रकरणात पोलिसांच्या अडचणी वाढणार का, असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)

अटक बेकायदेशीर असल्याचा न्यायालयात दावा

केतकीने आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. गुरूवारी केतकीने या प्रकरणात उच्च न्यायालयात दुसरी याचिका दाखल केली आहे. तसेच आता या प्रकरणात महिला आयोगाने देखील दखल घेतल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.