गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या (MTDC) निवासस्थानाला गेल्या दोन महिन्यात १ कोटी १० लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यावर विविध ठिकाणी पर्यटनासाठी महाराष्ट्रातील पर्यटकांनी गर्दी केली. त्याचा फायदा पर्यटन व्यवसायाला झाला असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राज्यातील निवासस्थानांपैकी गणपतीपुळेतील MTDC निवास व्यवस्थेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या मिनी बसेसकडे प्रवाशांची पाठ… कारण काय वाचा!)
गणपतीपुळे MTDC निवासस्थानाला पर्यटकांची पसंती
गणपतीपुळे येथील MTDC निवास्थानाला एक कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न एप्रिल आणि मे महिन्यात मिळाले आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वाधिक प्रतिसाद असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मे महिन्यात ४ लाखांहून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळ्याला भेट दिल्याचा अंदाज आहे.