राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस; ‘या’ दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

79

अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. राणा दाम्पत्याच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांविरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असून ८ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश या नोटीसमधून देण्यात आले आहेत.

८ जून रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर

मुंबईतील खार पोलिसांकडून राणा दाम्पत्याला ४ जून रोजी ही नोटीस मुंबईतील वांद्र्यातील निवासस्थानी पाठवली होती. यापूर्वी राणा दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारसोबतच मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केले होते. तर कोठडीत असताना आणि लॉकअपमध्ये असभ्य वागणूक दिल्याबद्दल पोलिसांवर अनेक आरोपही राणा पती-पत्नीने केले होते. यासह सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरूद्ध कलम ३५३ नुसार, मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकऱणी पोलीस ८ जून रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – 69 Loan App Banned: कर्ज वसुलीसाठी छळ, महाराष्ट्र सरकारकडून Google ला नोटीस)

पोलिसांनी अरेरावी केल्याचा राणा दाम्पत्याचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा जोडप्याने हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर पहारा दिला. तसेच, राणा दाम्पत्याच्या वांद्र्यातील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी घेराव घातला होता. राणा दाम्पत्य आपल्या निर्णयावर ठाम असल्याने पोलीस त्यांना कायदेशीर नोटीस देण्यासाठी त्यांच्या खार येथील घरी गेले होते. या कामात राणांनी पोलिसांना सहकार्य केले नाही तर पोलिसांवर अरेरावी केल्याचा आरोप त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.