छत्रपती संभाजी राजेंच्या अपक्ष खासदारकीला राष्ट्रवादीचा पाठिंबा

81
छत्रपती संभाजी राजे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन स्वतःच्या ‘स्वराज्य’ या नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता संभाजी राजे यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या उमेदवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना आणि काँग्रेस पक्षही छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील,  विश्वास शरद पवारांनी केला आहे.

शिवसेना-काँग्रेसबाबत पवारांना विश्वास 

संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना संभाजी राजेंना पाठिंबा जाहीर केला. प्रत्येक पक्षाचे संख्याबळ किती आहे, यावर सगळे अवलंबून असते. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतो. आमच्याकडे 10 किंवा 12 मत शिल्लक आहे. त्यांच्यानंतर शिवसेनेकडे सुद्धा चार पाच मत आहे, त्यांचीही काही अडचण राहणार नाही. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर ते सुद्धा मदत करतील, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.