पुण्याच्या बाजारपेठांमध्ये फेरफटका मारताना प्रत्येकाचे पाय आपोआप मस्तानीच्या दुकानाकडे वळतात. मुंबईकर किंवा इतर पर्यटक सुद्धा पुण्याला गेले की, आंबा मस्तानीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुन्हा परतत नाहीत. पुण्याच्या फेव्हरेट मॅंगो मस्तानीविषयी…
( हेही वाचा : गुगलमध्ये ‘हे’ सर्च कराल तर थेट जेलमध्ये जाल )
पुण्याची मस्तानी
सदाशिव पेठेत १९६७-६८ मध्ये सुजाता हे आइस्क्रिमचे दुकान सुरू झाले, आणि थोड्याच दिवसात तेथे मस्तानीही मिळू लागली. पूर्वी मस्तानी म्हणजे केवळ आइस्क्रिम व दूधाचे मिश्रण असे कालांतराने त्यात बदल होऊन साधे दूध न वापरता दाट आटवलेले दूध आणि त्यावर आइस्क्रिमचा गोळा असे पेय तयार झाले.
कालांतराने पुण्याच्या मस्तानीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि आता जगभरात ओळख मिळवली. आजही पुण्यात काय असा प्रश्न पुणेकरांना विचारल्यावर आमच्याकडे मस्तानी आहे असे रूबाबदार उत्तर दिले जाते.
ग्राहकांच्या आवडीचा विचार करून आता पिस्ता, आंबा, रोज, चॉकलेट अशा विविध फ्लेवर्समध्ये मस्तानी उपलब्ध आहे. सुजाता मस्तानीने आजही पारंपरिक चव जपत, नैसर्गिक फळांचा वापर करत ग्राहकांना जोडून ठेवले आहे.
संपूर्ण पुणे शहरात आता जवळपास २३ ठिकाणी सुजाता मस्तानी मिळू लागली आहे.