जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त नवी मुंबईत पर्यावरण प्रेमींनी १४ मे रोजी फ्लेमिंगो महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडे पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी मे आणि सप्टेंबर महिन्यात असा दोन वेळा जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस साजरा केला जातो.
नेरूळ येथील डीपीएस सरोसर येथे हा महोत्सव होणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. १३९ वर्षांपासून निसर्ग संशोधनात कार्यरत असलेली बीएनएचएस, नवी मुंबई महापालिका, महाराष्ट्र मॅंग्रोव्ह फाउंडेशन, गोदरेज मॅंग्रोव्ह फाउंडेशन, बाह्यउपक्रम संघटना वॅंडरिंग सोल्स, निकॉन आणि दिल्ली पब्लिक स्कूल यांच्या सहकार्यातून हा महोत्सव होणार आहे.