हृदय विकाराच्या झटक्याने अमेरिकेत पुतीनचा मृत्यू झाला आहे. पुतीन नावाचा वाघ गेल्या अनेक वर्षापासून अमेरिकेतील मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात वास्तव्याला होता. २००९ मध्ये झेक प्रजासत्ताकमध्ये या वाघाचा जन्म झाला होता. तेव्हा या वाघाचे नाव पुतीन असे ठेवण्यात आले. जन्म झाल्यावर ६ वर्षे हा वाघ डेन्मार्कच्या प्राणीसंग्रहालयात होता तिथून या पुतीन वाघाला मिनेसोटा येथे आणले होते. उपचारा दरम्यान या वाघाचा मृत्यू झाल्याने प्राणीसंग्रहालयात हळहळ व्यक्त केली जात आहे.
( हेही वाचा : एक सिम कार्डही पाठवू शकते तुम्हाला जेलमध्ये! )
हृदय विकाराचा झटका
शुक्रवारी रात्री पुतीनला हृदय विकाराचा झटका आला. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र तरीही पुतीनचा जीव वाचू शकला नाही. या वाघाचे वय १२ वर्षे होते. पुतीन या वाघाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करून सुद्धा त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. मिनेसोटा या अभयारण्यात आजवर ४४ वाघांचा जन्म झाला आहे. या प्राणीसंग्रहालयात अमूर वाघाच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. उत्तर अमेरिकेत १०३ अमूर वाघ आहेत. पुतीनचा मृत्यू झाल्याने आम्हाला दु:ख झाल्याचे प्राणीसंग्रहालयाचे संचालक जॉन क्रॉले यांनी सांगितले.